Home | Khabrein Jara Hat Ke | people are selling skulls on instagram, trending #skull and #skeleton

इंस्टाग्राम सुरू आहे मानवी हाडे आणि कवटींचा व्यवसाय, खरेदी करण्यासाठी लोकांमध्ये चढाओढ

दिव्य मराठी वेब, | Update - Jul 21, 2019, 12:23 PM IST

मागील दोन वर्षात 40 लाख रुपये वार्षीक उत्पन्न असलेला व्यवसाय 70 लाखांवर पोहोचला

  • people are selling skulls on instagram, trending #skull and #skeleton

    लंडन- ब्रिटेनमध्ये इंस्टाग्रामवरुन मानवी कवटीची विक्री सुरू आहे. विशेष म्हणजे या मानवी कवट्यांना लोक विकतही घेत आहेत. स्थानीक मीडिया "द सन"ने सांगितल्यानुसार, बहुतेक हाडं आणि कवट्यांची खरेदी विक्री रिसर्च, मेडिकल सायंससाठी केली जात आहे.


    यूनायटेड किंग्डममध्ये मानवी हाडांच्या विक्रीवर कोणतेच बंधन नाहीये. त्यामुळेच अतिशय सोप्या पद्धतीने या वस्तु मिळत आहेत. खरेदी करणारे विक्री करणाऱ्यांना पर्सनल मेसेज करतात. त्यानंतर त्या दोघांत डील होते आणि याची देवाण घेवाण होते. यात शिपींग आणि पॅकेजिंग सारखे खर्चदेखील आहेत.

    यूकेमध्ये या व्यवसायातून 70 लाखांचे उत्पन्न
    स्टॉकहॉम यूनिव्हर्सिटीच्या 2017 मध्ये प्रकाशित झालेल्या एका रिपोर्टनुसार- यूकेमध्ये हा व्यवसाय 46,000 पाउंड (40 लाख रुपये)चा आहे आणि तो रोज वाढतच आहे. काही रिसर्चर म्हणतात की, मागील दोन वर्षांमध्येच हे मार्केट वाढले आहे. सध्या या व्यवसायातून वार्षिक 7- लाख रुपयांचे कमाई केली जाते.

  • people are selling skulls on instagram, trending #skull and #skeleton

Trending