आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासिद्धमुख/चूरू (राजस्थान) - चूरु जिल्ह्यातील सिद्भमुख गावात गाईसोबत क्रुरतेची वागणूक केल्याची घटना समोर आली आहे. शेतातील पीक भूईसपाट केल्यामुळे काही जणांनी रागाच्या भरात गाईला काठीने जबर मारहाण केली. यानंतर तिच्या डोळ्यात आणि शरिरातील इतर भागावर तिखट टाकण्यात आले. एवढ्यावरच न थांबता निष्ठुरांनी गाईला बेशुद्ध करून तिला फरफटत गोशाळेच्या बाहेर टाकून फरार झाले.
दोघांविरोधात गोवंश कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. या प्रकारामुळे नाराज झालेल्या काही ग्रामस्थांनी नायब तहसीलदारांनी निवेदन देऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. राजगडचे डीएसपी महावीर प्रसाद शर्मा यांनी सांगितले की, सिद्धमुख गावात गाईसोबत केलेल्या अमानवीय कृत्याच्या घटनेनंतर पोलिसांनी नौरंगलाल आणि रामपत या दोघांना ताब्यात घेतले आहे. जयवीर जाट यांनी या दोघांसह इतर चार-पाच जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गोवंश कायदा 1995 अंदर्गत गुन्हा दाखल केला आहे.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ग्रामस्थांनी आरोपींचे कुटुंबीय आणि गोशाळा पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली. यामध्ये आरोपींच्या कुटुंबीयांनी यापुढे असे घडणार नसल्याचे ग्वाही दिली. पण ग्रामस्थांनी त्यांचे ऐकले नाही. यामुळे कोणताही तोडगा न निघता बैठक संपन्न झाली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.