आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

याठिकाणी रोजच साजरा केला जातो 31, तरुणाईची अशी धूम जगभरात दुसरीकडे अनुभवायला मिळणार नाही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वर्षाला निरोप देण्याची वेळ जवळ येत आहे. नवीन वर्षांच्या स्वागताची सर्वत्र तयारी सुरु झाली आहे. सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत ही अनेक देशांची परंपरा राहिली आहे. आता हे चित्र तसे सर्वत्र पाहायला मिळेत. मात्र एक शहर असे आहे जिथे रोजच झगमगाट असतो, ते शहर आहे बँकॉक. येथील रस्ते रात्री रोषणाईने उजळून निघालेले असतात. ही नाइट लाइफ कॅमेरात कैद केली आहे मॅसिज यांनी.


थायलंडची राजधानी बँकॉकमधील हे रंगीत नजारे फोटोग्राफर मॅसिज यांनी टिपले आहेत. या फोटोंमध्ये दिसणाऱ्या रस्त्यांवरील रंगत पाहता ब्रिटनच्या एखाद्या मोठ्या शहरातील हे चित्र असल्याचे जाणवते. 

 

हे शहर नाइटलाइफच्या चाहत्यांसाठी स्वर्गासमान आहे. दरवर्षी जगभरातील विद्यार्थी याठिकाणी मौज करण्यासाठी येत असतात. फोटोग्राफर मॅसिज हेदेखिल असेच पोहोचले होते. रॉयल पॅलेसजवळ असलेल्या खाओ सान रोड परिसरातील एका हॉटेलमध्ये ते थांबले. हा स्पॉट अनेक वर्षांपासून पॉप्युलर टुरिस्ट्स स्पॉट बनला आहे. हॉटेलच्या बाहेर दिसणाऱ्या या झगमगत्या नाईट लाइफला कॅमेऱ्याने टिपण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही.


दिवसा सामसूम असतो रस्ता
मैसिज यांनी सांगितले की, जर तुम्ही या ठिकाणी नवे असाल तर येथे तुमच्यासाठी करण्यासाठी नेहमी काही ना काही असते. दिवसा याठिकाणी त्यामानाने थोडी शांती असते. पण रात्री रस्त्यावर नाइट मार्केटची रंगत स्पष्ट दिसते. वीकेंड्सला या परिसरात गर्दीत सुमारे दुपटीने वाढ होते. लोकल थाई युवकही यात सहभागी होतात.


पुढील स्लाइड्वर पाहा, बँकॉकमधील या नजाऱ्याचे काही PHOTOS..  

बातम्या आणखी आहेत...