Home | National | Other State | People comes on the road for justice and police did a big disclosure in gaya in anjana honor killing

ऑनर किलिंग: आई आणि बहिणीच्या खुलास्याने आली सत्यता बाहेर, पोलिसांनी आई-वडील आणि एका युवकाला घेतले ताब्यात...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 12, 2019, 12:01 AM IST

28 डिसेंबरपासून बेपत्ता अल्पवयीन मुलीची 6 जानेवारीला मुंडके कापलेला मृतदेह मिळाला.

  • गया(बिहार)- 28 डिसेंबरपासून बेपत्ता असलेल्या अल्पवयीन मुलगी अंजनाचा मृतदेह मिळाल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली. अंजनाची हत्त्या करणाऱ्यांनी तिचा एक हात आणि मुंडके शरीरापासून वेगळे करून, त्याला केमिकल्सनी जाळले होते. या प्रकरणी पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. अंजनाच्या हत्त्येत ऑनर किलिंगचा अँगल दिसत आहे. 28 डिसेंबरला बेपत्ता झालेली अंजना 31 डिसेंबरला एका मुलासोबत घरी परतली होती. तिच्या वडिलांना कळाले होते की, ती कोणत्या मुलासोबत गेली होते, पण तरिही रिपोर्टमध्ये दुसरेच काही सांगण्यात आले.

    अंजनाच्या हत्त्येनंतर लोकांनी सीबीआय तपासाची मागणी केली
    कोणी विचारही केला नसेल की, अंजनाच्या निघृण खूनामध्ये तिच्या घरच्यांचाच हात आहे. गुरूवारी मानपूरच्या अंजनाला न्याय देण्यासाठी गावातील लोकांनी कँडल मार्च काढला. अंजनाला श्रद्धांजली दिली आणि घटनेचा शांततेत विरोध केला. लोकांचे म्हणने आहे की, अंजनातर आता या जगात नाही राहिली तरी तिच्या मारेकऱ्यांचा शोध लावून त्यांना शिक्षा दिली पाहिजे, तेव्हाच तिला न्याय मिळेल.

Trending