आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Suicide Song: हे गाणे ऐकून आत्महत्या करतात लोक, 63 वर्षांपासून अनेक देशांनी लावली होती बंदी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - मन उदास असताना बहुतांश लोक एखादे दुखी गीत (Sad Song) ऐकतात. सॅड साँग ऐकल्याने मन हल्के होते असा समज आहे. पण, या एक सॅड साँग असेही आहे की जे ऐकूण लोक आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतात. ऐकल्यावर कुणालाही यावर विश्वास बसणार नाही. परंतु, The Gloomy Sunday Song खरोखर इतके सॅड आहे. हे ऐकून लोकांनी आत्महत्या केल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळेच, गेल्या 63 वर्षांपासून या गाण्यावर बंदी लावण्यात आली होती. 


> 63 वर्षांच्या बंदीनंतर जगातील सर्वात दुखी गाणे परतले आहे. 1933 मध्ये हंगेरीतील रेझो सेरेस (Rezso Seress) ने हे गाणे आपल्या प्रेयसीच्या आठवणीत कंपोझ केले होते. या गाण्यात इतक्या वेदना आहेत, की लोक ऐकूण खूप भावूक होतात. त्यांच्या आयुष्यात घडलेल्या दुखी आठवणी त्यांच्यासमोर जाग्या होतात. कदाचित यामुळेच, कित्येक लोकांनी हे ऐकून आत्महत्या केली आहे. 
> रेझो सेरेस यांचे बालपण अतिशय हलाखिच्या परिस्थितीत गेले होते. त्यांच्या समस्त आयुष्यावर गरीबी आणि दुखाचा पगडा होता. तारुण्यात पदार्पण करत असतानाच ते एका तरुणीच्या प्रेमात पडले होते. सेरेस त्या तरुणीवर जिवापाड प्रेम करत होते. तिच्यासाठी काहीही करण्यास तयार होते. 
> सुरुवातीला तरुणीने देखील सेरेसवर प्रेम केले. मात्र, काही दिवसांतच तू गाणे सोडून काही दुसरे काम कर असा आग्रह सुरू केला. यावरून दोघांमध्ये वाद झाले आणि सेरेस यांची प्रेयसी दूर गेली. प्रत्यक्षात तिने सेरेसला नाही, तर हे जग सोडले होते. तिने आत्महत्या केली. सेरेस यांच्या प्रेयसीने आत्महत्या करण्यापूर्वी केवळ दोन शब्द gloomy sunday असे लिहिले होते. यावरूनच सेरेसने ग्लूमी संडे साँग लिहिले. ते हंगेरीसह जगभर प्रसिद्ध झाले. मात्र, या प्रसिद्धीचे कारण वेगळेच होते.

 

बातम्या आणखी आहेत...