आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वातंत्र्यदीनानिमित्त होत असलेल्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी, 16 जणांचा मृत्यू तर 75 जखमी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंतानानारिवो- मेडागास्करची राजधानी अंतानानारिवोच्या महामासीना स्टेडियममध्ये बुधवारी स्वातंत्र्यदिनानिमित्त होत असलेल्या कार्यक्रमात अचानक चेंगराचेंगरी झाली. या सर्व घटनेत 16 जणांचा मृत्यू झाला तर 75 पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत. हा माडागास्करचा 59 वा स्वातंत्र्य दिवस होता.


राष्ट्रपतींनी हॉस्पीटलमध्ये जाऊन लोकांनीच चौकशी केली
प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार, कार्यक्रमादरम्यान पारंपरिक मिल्ट्री परेडचे आयोजन केले होते. परेड संपल्यानंतर सुरक्षारक्षकांनी लोकांना बाहेर जाण्यासाठी स्टेडिअमचे मुख्य गेट उघडले. पण, काही वेळानंतर त्यांनी गेट बंद केले आणि यामुळेच गोंधळ होऊन चेंगराचेंगरी झाली.

 

29 वर्षीय प्रत्यक्षदर्शी जीन क्लाउडने सांगितले की, ‘जेव्हा कार्यक्रमाच्या आयोजनकर्त्यांनी गेट उघडले, जेव्हा मी प​​​​​हिल्या रांगेत सगळ्यात पुढे होतो. गोंधळात मलाही थोडे लागले.’

 

मेडागास्करचे राष्ट्रपती अँड्री राजोलिना यांनी हॉस्पीटलमध्ये जाऊन जखमी लोकांची चौकशी केली. राजोलिना म्हणाले, ‘स्टेडियममध्ये क्षमतेपेक्षा जास्त लोक आले होते, त्यामुळेच ही दुखःद घटना घडली. सध्या सगळ्या जखमींवर उपचार सुरू आहेत.’


स्थानीक मीडियानुसार, अंतानानारिवोमध्ये असलेल्या महामासीना म्यूनिसिपल स्टेडिअमची क्षमता 22 हजार लोकांची आहे. कार्यक्रमादरम्यान क्षमतेपेक्षा दुप्पट लोक जमा झाले होते. स्टेडिअममध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आणि खेळांचे आजोजन केले जाते.


यापूर्वीही स्टेडिअममध्ये सप्टेंबर 2018 मध्ये एका फुटबॉल सामन्यादरम्यान अशीच चेंगराचेंगरी झाली होती. यादरम्यान एका महिलेचा मृत्यू झाला होता तर 30 पेक्षा जास्त लोक जखमी झाले होते. तर, 26 जून, 2016 मध्ये एका कार्यक्रमादरम्यान बॉम्ब ब्लास्ट झाला होता. त्यात तिघांचा मृत्यू झाला होता.