आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निमदरीसह घाटलाडकी गावामध्ये दोन दुचाकींच्या अपघातातील दोघांचा मृत्यू

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


अमरावती - निमदरी (ता. अचलपूर) व घाटलाडकी (ता. चांदूर बाजार) येथे दोन दुचाकीच्या अपघातातामध्ये जखमी झालेल्या राजाराम बाबूजी सिरस्कर (वय ८०, रा. निमदरी) व मो. अयुब शेख हबीब (वय ५५, रा. घाटलाडकी) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 


निमदरी येथील राजाराम सिरस्कर २५ डिसेंबर रोजी नातवासोबत दुचाकीने (क्रमांक एमएच २७- ५४२७) निमदऱ्याहून परतवाडा येथे जात होते. दरम्यान सकाळी साडे दहाच्या सुमारास एकलासपुरनजीक विरुद्ध दिशेने येणाऱ्या अज्ञात दुचाकीस्वाराने (क्रमांक एमएच २७ सीजी ७६६०) समोरासमोर धडक दिली. यात सिरस्कर रोडवर आपटल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी कुलदिप सिरस्कर याच्या तक्रारीवरून परतवाडा पोलिस ठाण्यात अज्ञात दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दुसऱ्या घटनेत घाटलाडकी येथील मो. अयुब शेख दुचाकीने (क्रमांक एमएच २७ बीव्ही १३७१) सांभोरा रोडने भरधाव जात असताना खरगोन नाल्यानजीक विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीला (क्रमांक एमएच २७ एपी ८४१४) धडक दिली. यात मो. अयुब शेख व दुसरा दुचाकीस्वार नंदकिशोर रामदास उईके दोघेही जखमी झाले. दरम्यान, मो. शेख अयुब यांना उपचारासाठी नागपूर येथे हलवण्यात आले होते. उपचारादरम्यान मो. शेख अयुब यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी ब्राह्मणवाडा थडी पोलिस ठाण्यात मृतक मो. शेख अयुब यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 

बातम्या आणखी आहेत...