Delhi / भारतात अस्पृश्य प्रथा इस्लाममुळे आली, तर दलित शब्द इंग्रजांमुळे अस्तित्वात आला - आरएसएस नेते कृष्ण गोपाल

प्राचीन भारतात दलित शब्द अस्तित्वात नव्हता, महर्षी वाल्मिकी दलित नाही तर शुद्र होते - संघ नेता 

दिव्य मराठी वेब

Aug 27,2019 11:03:19 AM IST

नवी दिल्ली - राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे संयुक्त महासचिव कृष्ण गोपाल यांनी सोमवारी विवादास्पद विधान केले. प्राचीन भारतात गोमांस खाणाऱ्याला अस्पृश्य मानले जात होते. तसेच प्राचीन भारतात दलित शब्द नव्हता. आधुनिक भारतात इंग्रजांच्या आगमनानंतर दलित शब्द अस्तित्वात आल्याचे ते म्हणाले.


कृष्ण गोपाल यांनी 'भारत का राजनीतिक उत्तरायण' आणि 'भारत का दलित विमर्श’पुस्तकांच्या प्रकाशन कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमात सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री प्रल्हाद पटेल यांचीही उपस्थिती होती. गोपाल म्हणाले की, संविधान सभेने देखील 'दलित' ऐवजी 'अनुसूचित जाती' शब्दाचा वापर केला होता. पण इंग्रजांमुळे दलित शब्द भारतीय समाजात हळू-हळू पसरत गेला.


इस्लामिक युक एक काळा अध्याय होता
भारतीय इतिसाहात इस्लामिक युग एक काळा अध्याय होता. भारताव्यतिरिक्त इतर कोणताही देश इस्लामिक युग झेलू शकला नाही. आपण या युगाशी लढलो ही आपली सांस्कृतिक आणि आध्यात्मिक शक्ती होती. इस्लाम नंतरच गोमांस खाण्याची प्रथा आल्याचे कृष्ण गोपाल म्हणाले.


गोमांस खाणाऱ्याला अस्पृश्य घोषित केले
कृष्ण गोपाल पुढे म्हणाले की, भारतात गोमांस खाल्यानंतर अस्पृश्यतेचे पहिले उदाहरण समोर आले. गोमांस खाणाऱ्यांना अस्पृश्य घोषित करण्यात आले होते. हे खुद्द डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील लिहिले आहे. पण हा शब्द हळू-हळू पसरत गेला आणि समाजाच्या एक मोठ्या भागालाच अस्पृश्य घोषित करण्यात आले. दीर्घाकाळापर्यंत त्यांना त्रास देण्यात आला, त्यांची अवहेलना करण्यात आली. रामायण लिहिलणारे वाल्मिकी दलित नाही तर शूद्र होते. याव्यतिरिक्त अनेक महान ऋषीमुनी शुद्र होते आणि त्यांचा सन्मान करण्यात केला जात होता.

X
COMMENT