आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • People Gave Great Promises In Witnessing Against Kasab; But No One Has Come For Help

\'कसाब\' विरोधात साक्ष देताना मोठमोठी आश्वासने दिली; पण मदतीसाठी कोणी पुढे आलेले नाही : देविका रोटावनने मांडले आपले दुःख

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उदयपूर - मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दोषी ठरलेल्या कुख्यात अशा अजमल कसाबविरोधात न्यायालयात साक्ष देणाऱ्या देविका रोटावन हिला आपल्या शौर्याची शिक्षा भोगावी लागत आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. त्या काळात आजारपणामुळे तिला शाळेत जाता आले नव्हते. वडिलांचा ड्रायफ्रूटचा व्यवसाय बंद झाला. ती जेथेही जाते तिच्याविषयी लोकांच्या मनात एक प्रकारची भीती वाटते. तिने साक्ष दिली, पण त्याचे जे काही परिणाम होतील ते भोगण्याची वेळ आपल्यावर येऊ नये असे लोकांना वाटते. देविकांचा शनिवारी राजस्थानातील झाडोल येथे भारतीय नववर्षाच्या स्वागताप्रीत्यर्थ आयोजित कार्यक्रमात सत्कार करण्यात येणार होता. या वेळी “दिव्य मराठी’शी बोलताना ती म्हणाली, कुुख्यात दहशतवादी अजमल कसाब याच्याविरोधात साक्ष दिली तेव्हा देशातील अनेक संस्था, विभाग व सरकारांनी काही आश्वासने दिली होती. परंतु त्यातील एकाही आश्वासनाची पूर्तता अद्याप झालेली नाही. देविकाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती केली होती की, पंतप्रधान मुलीच्या प्रगतीबाबत बोलत असतात, परंतु त्यांनी आपली एकदाही भेट घेतलेली नाही. ती म्हणाली, मला राहण्यासाठी स्वत:चे घर नाही. शिक्षणाची पुरेशी साधने नाहीत.  आयपीएस अधिकारी होण्याचे माझे  स्वप्न आहे. परंतु कोणी मदत केलेली नाही.  

 

स्टेशनवर गोळीबारात जखमी झाली देविका  
देविका म्हणाली,  त्या रात्री मी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर होते. तेव्हा उजव्या पायाला गोळी लागली होती. दरम्यान, देविका व तिचे वडील नटवरलाल यांनी कसाबला प्रत्यक्षात पाहिले होते. कसाबला शिक्षा देण्यासाठी दोघांनी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार म्हणून त्याची ओळख पटवली होती. तसेच त्याच्याविरुद्ध साक्षही दिली होती.   

 

नुकसान भरपाई औषधातच खर्च  
देविकेस २०१४ मध्ये क्षयरोगाचा आजार झालेला होता. हल्ल्यातील पीडित म्हणून तिला सुमारे ३.२५ लाख रुपये नुकसान भरपाई मिळाली. हा पैसा आजारपणात खर्च झाला. त्यानंतर चार वर्षे तिला शिक्षण घेता आले नव्हते. देविका आता ११ व्या वर्गात शिकते. मुंबई हल्ल्यादरम्यान तिचे वय ९ वर्षे होते. 

बातम्या आणखी आहेत...