आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#MainBhiChowkidar कॅम्पेनला युवकांचा प्रचंड प्रतिसाद, हातावर गोंदवून घेत आहेत 'मैं भी चौकीदार'चा टॅटू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली । काँग्रेसने 'चौकीदार चोर है' म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आरोप केले. नरेंद्र मोदींनी याच वाक्याचा आधार घेत सोशल मीडियावर 'मैं भी चौकीदार' हे अभियान सुरु केले आहे. शुक्रवारी मोदींनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर नावाच्या पुढे चौकीदार लावले आहे. यानंतर त्यांना समर्थन देण्यासाठी सोशल मीडियावर आपल्या नावाच्या पुढे चौकीदार लिहिण्याचा ट्रेंड सुरु झाला. गेल्या दोन दिवसांपासून मोदींचे हे अभियान चांगलेच प्रसिद्ध झाले आहे. युवकांमध्ये या अभियानाची क्रेझ पहायला मिळतीये. युवक मोदी यांच्या #MainBhiChowkidar या अभियानाला प्रतिसाद देण्यासाठी आपल्या सोशल मीडियावर नावाच्या पुढे चौकीदार लावत आहेत. इतकेच नाही तर 'मैं भी चौकीदार' अशा नावाचा टॅटू आपल्या हातावर गोंदवून घेत आहेत. आतापर्यंत अनेक युवकांनी आपल्या हातावर टॅटू गोंदवून या अभियानाच्या समर्थनात आले आहेत. 

 

गेल्या दोन दिवसांत सर्वाधिक ऑर्डर  
टॅटू आर्टिस्ट निशांतने सांगितले की, आतापर्यंत त्यांना अशा 100 ऑर्डर मिळाल्या आहेत. ऑर्डर देणाऱ्यांमध्ये सर्व युवक आहेत. दिल्लीपासून भोपाळ आणि इतर अनेक राज्यांमध्ये लोकांनी चौकीदार नावाचे टॅटू गोंदवून घेताना दिसत आहे. भाजपाच्या या अभियानामुळे प्रभावित होऊन अनेक राज्यांतील टॅटू आर्टिस्ट मोफत टॅटू गोंदवून देत आहेत.  

 

इतकी आहे किंमत 
टॅटू आर्टिस्ट ऋषभनुसार, #MainBhiChowkidar टेंपरेरी टॅटू बनविण्यासाठी किमान 500 ते 2 हजार रुपयांपर्यंत खर्ज येतो. तर परमानेंट टॅटू काढण्यासाठी 4 हजार रूपये खर्च करावे लागतात. सध्यातरी 'मैं भी चौकीदार' गोंदवून घेणारे युवक टेंपररी टॅटू काढत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...