Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | people going back to their house after flood

महापूर ओसरला पण संसार पडले उघड्यावर, पाणी कमी झाल्यामुळे अनेकांचे पाय वळले घराकडे

दिप्ती राऊत, | Update - Aug 11, 2019, 05:34 PM IST

पाणी ओसरू लागल्याने अनेकजण आपापल्या घराकडे जात आहेत

 • people going back to their house after flood

  सांगली- गेल्या काही दिवसांपासून सांगलीत पावसाने धुमाकूळ घातला. कोल्हापूर-सांगलीत पावसामुळे महापूरासारखे मोठे संकट निर्माण झाले. अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने त्यांना बाहेर पडणेही अवघड झाले आहे. यावेळी अनेकजण या अडकलेल्या लोकांना बाहेर सुरक्षित काढण्यसाठी मदत करत आहेत. एनडीआरफ, लष्कर आणि नेव्हीचे जवान अनेक दिवसांपासून युद्ध पातळीवर बचावकार्य करत आहेत.

  सध्या सांगलीतील पाणी ओसरू लागल्याने अनेकजण आपापल्या घराकडे जात आहेत. पुरामुळे अनेकांच्या घरातील सामान अस्ताव्यस्त झाले आहे, तर अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. पण तरीदेखील आपला मोडलेला संसार परत उभा करण्यासाठी आणि आपले आयुष्य पुन्ह्याने सुरू करण्यासाठी अनेकांचे पाय घराकडे सरसावत आहेत. दरम्यान, पुरग्रस्तांना आर्थिक मदत करण्यासाठी त्यांच्याकडून ओळखपत्राची तपासणी केली जात आहे. यावेळी एक आजोबा आपले ओळखपत्र घेऊन मदतीसाठी इकडे तिकडे फिरताना दिसत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कमीत-कमी ओळखपत्रात मदत पुरवली जावी असे आव्हान प्रशासनाला केले आहे. पूर स्थिती सध्या निंयंत्रणात येत असली तरी, प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Trending