Home | Khabrein Jara Hat Ke | people of Cajamarca rejects mining of gold in Colombia

या गावाखाली आहे 700 टन सोन्याचे भांडार, किंमत तब्बल अडीच लाख कोटी, सोन्याचा वापर झाला असता तर बदलले असते देशाचे भविष्य...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 23, 2019, 06:12 PM IST

ग्रामस्थांनी या भीतीमुळे करू दिले नाही खोदकाम

 • people of Cajamarca rejects mining of gold in Colombia

  बगोटा- कोलंबियामध्ये बगोटा परिसरात असलेले छोटेशा काजामारकाच्या गावातील लोकांनी गावाखाली असलेल्या सोन्याच्या खाणीचे खोदकाम करण्यास विरोध केला आहे. या गावाखाली 680 टन सोन्याचे भंडार आहे. ज्याची किंमत 35 बिलीयन डॉलर म्हणजे जवळपास 2.43 लाख कोटी रूपये आहे. खोदकामासाठी लोकांचे मत घेण्यात आले. यात गावातील सर्व लोकांनी खोदकामाला विरोध केला आणि म्हणाले जर पर्यावरण राहीले तरच आपण जगू शकतो.

  लोकांनी केला जोरदार विरोध
  काजामारकामध्ये खोदकामासाठी घेण्यात आलेल्या जनमतादरम्यान 19 हजार लोकसंख्या असलेल्या गावात फक्त 79 लोकांनीच खोदकामाच्या बाजूने मतदान केले तर बाकीच्या सर्व लोकांनी याला विरोध केला. लोकांचे म्हणने होते की जर 'पर्यावरण वाचले तरच आपण जगू शकतो'. आम्हाला वाटते की, आपल्या येणाऱ्या पिढीला चांगले आरोग्य आणि पर्यावरण मिळाले पाहिजे.


  कोलंबिया सरकारनुसार काजामारका गावात असलेले हे सोण्याचे भंडार दक्षिण अमेरिकीतील आतापर्यंतचे सर्वात मोठे सोन्याचे भंडार आहे. सरकारने अफ्रिकी कंपनी अॅंग्लोगोल्डला येथे खोदकाम करण्याची जबाबदारी देण्याचा निर्णय घेतला होता. या खाणीला 'ला कोलोसा' नाव पण दिले आहे.


  सरकारचे असे माणने होते की, आता येथे मार्क्सवादी विद्रोही नष्ट झाले आहेत. त्यामुळे येथे सहज खोदकाम केले जाऊ शकते. पण जनमतानंतर सरकारच्या अपेक्षा संपल्या. 21 वर्षाची विद्यार्थी कॅमिला मेंडिजचे म्हणने आहे की, मी भविष्याला समोर ठेऊन मतदान केले, कारण माझे दोन लहान भाचे आहेत. तिकडे कोलंबियाचे खाणकाममंत्री जर्मन एर्सने जनमताने दिलेल्या निर्णयावर आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्यानूसार प्रचारकांनी या प्रकरणात लोकांची दिशाभूल केली आहे.


  सोन्यांच्या खाणींमध्ये अमेरिका पहिला तर भारताचा 10 वा क्रमांक

  सोने अडचणीच्या काळात कामी येते, म्हणून अनेक देश याला रिजर्व ठेवतात. वर्ल्ड गोल्ड काउंसिल च्या रिपोर्टनूसार सर्वात जास्त सोन्यांच्या खाणींच्या यादीत अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे. यानंतर जर्मनी, इटली, फ्रांस आणि चीन या देशांचा क्रमांक लागतो. तर भारताचा सोन्यांच्या खाणींच्या यादीत 10 क्रमांक लागतो. भारताजवळ या वेळेस सुमारे 608 टन सोने रिझर्व आहे.

Trending