special / एकमेकांना आकर्षितच नव्हे तर चांगले निर्णयही घेतात भिन्न स्वभावाचे लोक

जोडीदार तुमचे हित जपत असेल तर स्वत:चा स्वार्थ सोडून त्याच्या बाजूने निर्णय घ्या, यात जेवण, चित्रपट पाहणे, इतरही महत्वाच्या निर्णयाचा समावेश

वृत्तसंस्था

May 16,2019 11:18:00 AM IST

वॉशिंग्टन - दोघांचे स्वभाव भिन्न असले तरी एकमेकाकडे ते आकर्षित होतात. चांगले निर्णयही घेतात. या निर्णयात कोणत्या रेस्तराँमध्ये जेवण घ्यायचे, कोणता चित्रपट पाह्यचा, सुट्ट्यात कोठे जायचे? आदीपासून जीवनातील इतर महत्त्वाच्या निर्णयांचा समावेश आहे. एका अभ्यासात ही बाब स्पष्ट झाली आहे. बोस्टन कॉलेज, जॉर्जिया टेक्नाॅलॉजी आणि वॉशिंग्टन स्टेट यूनिव्हर्सिटीतील संशाेधकांना भिन्न स्वभावाचे लोक एकत्र येऊन समाधानकारक निर्णय घेतात का‌? यावर जाणून घ्यायचे होते. या अभ्यासात त्यांना जोडीदार स्वार्थी असेल तर आपला स्वार्थ साधण्याएेवजी त्याच्या हिताचा निर्णय घेणे खूप चांगले असते. तसेच लोकहित पाहणारा जोडीदार असेल तर निर्णय घेण्यात चूक होऊ नये यासाठी स्वत: स्वार्थी व्हा. वरील निष्कर्ष जर्नल ऑफ कंझ्युमर सायकॉलॉजीत प्रकाशित झालेले आहेत.

एकापेक्षा जास्त पर्याय असतील तर निर्णय घेणे जाते सोपे
संशोधक रिस्टिना निकॉलोव्हा हिने सांगितले, निर्णय घेताना तुमचा जोडीदार स्वार्थ पाहतोय, असे दिसले तर आपला परोपकारी स्वभाव सोडून त्याला निर्णय घेऊ द्या. कारण त्याचे परिणाम तुमच्या जोडीदाराबरोबरीने स्वार्थी होऊन घेतलेल्या निर्णयापेक्षाही चांगले ठरतील त्या म्हणाल्या, स्वार्थी आणि दुसऱ्याचे हित जोपासणारा असे भिन्न स्वभाव असलेले जोडीदार एखादा निर्णय घेतील तर ते एकमेकांना आपली आवड-निवड स्पष्टपणे सांगतील. दुसरा तो निर्णय मान्यही करेल. स्वार्थी जोडीदार आपली आवड सांगतो तेव्हा दुसऱ्याला काही पर्याय सापडले तर तोही सहजपणे मान्य करतो. अशा वेळी त्यांची अावड सारखीच येते. मग तो निर्णय कोणी घेतला होता, याने काही फरक पडत नाही. उलट निर्णय कोणाचा होता, कशासाठी घेतला गेला हे महत्त्वाचे ठरते. उलट हा निर्णय त्या जोडीदारांनी मिळून घेतलेला असण्याची शक्यता जास्त असते.

X
COMMENT