आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्थसंकल्पावर मोदींची प्रतिक्रीया; म्हणाले- 'हे देशाचे ड्रीम बजेट आहे...', 'सगळी जुनीच आश्वासने आहेत, नवीन काहीच नाही'- काँग्रेस

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- लोकसभेत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मोदी सरकार 2.0 चे पहिले बजेट सादर केले. या बजेटवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपली प्रतिक्रीया दिली. ते म्हणाले- ' हे देशाचे ड्रीम बजेट आहे. या बजेटमध्ये उद्योग आणि उद्योजक सशक्त होतील. यात गाव-गरिबांवर लक्ष केंद्रित केले आहे. हे बजेट शिक्षणाला चांगल्या स्तरावर घेऊन जाईल, आर्टिफिशअल इंटेलिजंस(एआय) आणि स्पेस(उपग्रह) चा फायदा नागरिकांनाच मिळणार आहे. तर दुसरीकडे काँग्रेसनेही यावर आपली प्रतिक्रीया दिली आहे. ते म्हणाले-'या बजेटमध्ये काहीच नवीन नाहीये, सगळी जुनी आश्वासने परत आणली आहेत.

'

बजेटनंतर पंतप्रधान म्हणाले की, सामान्य नागरिकांसाठी यात ईज ऑफ लिव्हींग आहे. हे एक ग्रीन बजेट आहे. यात सोलार सेक्टर, पर्यावरण संरक्षणावर जोर देण्यात आला आहे. मागील पाच वर्षात देश आत्मविश्वासाने भरला आहे. अनेक त्रांसामधून सामान्य नागरिकांचे आयुष्य सुधरवले आहे.


‘मी निर्मला आणि त्यांच्या टीमला शुभेच्छा देतो’ 
मोदी म्हणाले, "जनशक्तीशिवाय जल संचय संभव नाहीये. जल संचय जनभावनेनेच होऊ शकतो. स्वच्छ भारत मिशनप्रमाणेच प्रत्येक घरात पाणी अभियान देशाला पाणाच्या समस्येपासून वाचवण्यासाठी सक्षम बनवेल. हे वजेय तरुणांनाही नवीन वाटा उघडण्यासाठीचे आहे. हे बजेट तुमच्या स्वप्नांना साकार बनवण्याचे बजेट आहे. मी उद्या वाराणसीत याबाबत विस्ताराने बोलेल."

 

"आम्हाला यशही मिळाले आहे. आज लोकांच्या जीवनात नवीन आकांक्षा आहेत. हे बजेट लोकांना विश्वास देत आहे की, मार्ग बरोबर आहे, वेग बरोबर आहे. यामुळेच आपल्या लक्षापर्यंत पोहचणे निश्चीत आहे. मी निर्मलाजी आणि त्यांच्या टीमला शुभेच्छा देतो."

"सरकारने गरीब-शेतकरी-दलीत-पीडित-शोषीत-वंचितांना सशक्त करण्यासाठी मोठी पाऊले उचलली आहेत. आता येणाऱ्या 5 वर्षात हे सशक्तीकरण त्यांना देशाचे पॉवर हाउस बनवेल. 5 ट्रिलिअन डॉलर इकोनॉमीच्या स्वप्नाला पूर्ण करण्याची उर्जा देशला याच पॉवरहाउसमुळे मिळेल."


काहीच नवीन नाही- काँग्रेस  
लोकसभेत काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी या बजेटमध्ये काहीच नसल्याचं म्हटले. ते म्हमाले, जुन्याच आश्वासनांना परत आणले आहे. ते न्यू इंडियाबद्दल बोलतात, पण हे बजेट नव्या बॉटलमध्ये जुनी वाइन आहे. यात काहीच नवीन नाहीये. रोजगारासाठी काहीच नवीन योजना नाहीयेत.