आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • People Preference Real Estate For Investment; 59% Said They Would Prefer Real Estate

गुंतवणुकीसाठी सामान्यांची रिअल इस्टेटलाच पसंती; ५९ % म्हणाले, रिअल इस्टेटला प्राधान्य देऊ

एका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
अनुज पुरी, चेअरमन, एनरॉक - Divya Marathi
अनुज पुरी, चेअरमन, एनरॉक
  • एनरॉक-एलआयसी हाउसिंग फायनान्सची सहामाही पाहणी

नवी दिल्ली- रिअल  इस्टेट क्षेत्र भलेही मागील काही वर्षांपासून मरगळलेल्या स्थितीतून जात असेल, मात्र देशात गंुतवणुकीच्या दृष्टीने रिअल इस्टेट सर्वात जास्त आवडीची मालमत्तेची श्रेणी ठरली आहे. हे वास्तव मालमत्ता कन्सल्टंट फर्म आणि एलआयसी हाउसिंग फायनान्सच्या संयुक्त सर्वेक्षणात समोर आले. २०१९ च्या दुसऱ्या सहामाहीत एनरॉक्स कन्झ्युमर सेंटिमेंट नावाच्या या मल्टिचॅनल पाहणीत ई-मेल, वेब लिंक आणि लिंक्डइनद्वारे २,६०२ लोकांचे मत अजमावले.


यामध्ये ५९% लोकांनी सांगितले की, गुंंतवणुकीसाठी शेअर बाजार, मुदत ठेव आणि सोन्यासारख्या अन्य अॅसेट क्लासच्या तुलनेत रिअल इस्टेटमध्ये गुंतवणुकीला प्राधान्य देतील. वर्षभरापूर्वी समान अवधीत केलेल्या पाहणीत रिअल इस्टेटला प्राधान्य देणाऱ्यांचा आकडा ५३% होता. अहवालानुसार, गुंतवणुकीच्या दृष्टीने रिअल इस्टेटला प्राधान्य देणाऱ्यांच्या संख्येत वाढ संभाव्य खरेदीदारांचा मूड दाखवते.

४२ टक्क्यांची मध्यम श्रेणीचे घर खरेदी करण्याची इच्छा

मध्यम श्रेणीतील घरांची मागणी परवडणाऱ्या घरांपेक्षा जास्त आहे. ज्यांची किंमत ४५ ते ९० लाखांदरम्यान आहे, अशांना मध्यम श्रेणीची घरे म्हटले जाते. सर्वेक्षणात उत्तर देणाऱ्या ४२% लोकांनी सांगितले की, मध्यम श्रेणीचे घर खरेदी करू इच्छितात. दुसरा क्रमांक ३१ टक्क्यांनी ४५ लाखापेक्षा कमी किमतीचे घर खरेदीची इच्छा व्यक्त केली. ६७% नी वैयक्तिक वापरासाठी खरेदीची इच्छा दाखवली.

मालमत्ता बाजारपेठेत तरुणाई महत्त्वाची

या नव्या दशकात मिलेनियल्स(२३ ते ४८ वयाेगटातील तरुणाई)च्या बदलत्या प्राधान्यक्रमाने मालमत्ता बाजारपेठेचे चित्र बदलले. बाजारपेठ ग्राहकांकडून संचालित होईल.
-अनुज पुरी, चेअरमन, एनरॉक
 

बातम्या आणखी आहेत...