Home | National | Gujarat | People reached with utensils when Tanker filled with chemical turned down near barwani

रस्त्यावर पलटी झालेल्या टँकरमधून येत होते लिक्वीड, लोकांना वाटले पेट्रोल आहे म्हणून भांडे घेऊन गेले, ड्रायव्हर म्हणाला- विष आहे घेऊ नका...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 14, 2019, 12:04 AM IST

काही वेळानंतर या जीवघेण्या द्रव्याबद्दल कळाले.

  • बडवानी- विषारी केमिक्लसने भरलेल्या ट्रकचा अपघात होऊन तो ट्रक पलटी झाला. त्यानंतर त्यातून केमिकल बाहेर येत होते. लोकांना वाटले पेट्रोलचा टँकर आहे आणि त्यातून पेट्रोल येत आहे, त्यामुळे सगळे भांडे घेऊन जमा झाले. नंतर घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन लोकांना दुर हकलले.

    ज्वलनशील केमिकल होते टँकरमध्ये
    - ड्रायव्हरने सांगितले की, टँकरमध्ये ज्वलनशील केमिलकर मिथेनॉल भरलेले होते. लोक त्याला पिण्याचा प्रयत्न करत होते, पण त्यांने ते करण्यापासून रोखले.

    - हे टँकर रतलाम वरून गुजरातला जात होता. पलसूदपासून दोन किलोमीटर दुर सिदडी गावात टँकरचा अपघात झाला.

    - टँकर पलटी झाल्याची बातमी पसरताच लोक पेट्रोल समजून ते भरण्यासाठी भांडे घेऊन आले. पण ड्रायव्हरने पोलिसांना माहिती दिली होती त्यामुळे घटनास्थळी आलेल्या लोकांना पोलिसांनी हकलून लावले.

Trending