आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • People Said Riots Of 2020 Were Dangerous Than 1984; Rioters Came From Outside, There Was No Known Face

'1984 पेक्षाही 2020 ची दंगल भयंकर होती; दंगेखोर बाहेरुन आले होते', दंगल पीडितांनी व्यक्त केल्या भावना

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • महिला म्हणाल्या- तेव्हा फक्त शिखांना टार्गेट केले होते, पण यावेळेल हिंदू आणि मुस्लिमांनाही मारले

अक्षय बाजपेयी

नवी दिल्ली- दिल्लीमध्ये झालेल्या दंगली 1984 च्या दंगलींपेक्षाही भयंकर होत्या. 1984 मध्ये शिख समाज टार्गेटवर होता. तेव्हा कोणीही शिख पाहताच हल्ला करायचे, पण दिल्ली दंगलीत कोणीच ओळखीचा दिसत नव्हता. सर्वजण बाहेरुन आले होते. कोण कोणाला मारतोय, हे मरणाऱ्याला आणि मारणाऱ्यालाही माहित नव्हते. अनेकांना फक्त संशयातूनच मारण्यात आले, हे सांगताचा 1984 दंगल पीडित गुरमीत सिंग यांना अश्रु अनावर झाले.


गुरमीत सिंग यांचे 1984 च्या दंगलीत 40% शरीर जळाले होते. ते तेव्हा दिल्लीतील खजूरी खास परिसरात राहत होते, आताही ते तिथेच राहतात. त्यांनी सांगितले की, 1984 मध्ये मी 16 वर्षांचा होतो. तेव्हाही दंगल सुरू झाल्यानंतर 2-3 दिवस पोलिस आले नव्हते, आताही नाही आले. 2 नोव्हेंबर 1984 ला मी घराबाहेर होतो, पण दंगलखोर मला मी शिख असल्याचे ओळखू शकले नाही म्हणून मी वाचलो. पण, 3 नोव्हेंबरला दंगलखोर थेट माझ्या घरात घुसले आणि माझ्या अंगावर जळते टायर टाकून पळाले, त्यात माझे शरीर भाजले. 

अशा परिस्थितीतही तुम्ही खजूरी खास परिसरात राहण्याची हिम्मत कशी करता? या प्रश्नावर गुरमीत म्हणाले की, "आमचे शेजाऱ्यांसोबत चांगले संबंध होते, त्यांनी त्यावेळेस आमची खूप मदत केली. त्यांच्यामुळेच मला या भागात राहण्याची हिम्मत आली. दंगलखोर आले आणि गेले, पण शेजाऱ्यांनी इथेच राहण्याची हिम्मत दिली. या भागात राहण्याची एक मजबुरी म्हणजे, दुसरीकडे कमवायचे साधन काहीच नव्हते. इथे टिकलो म्हणून आपला धंदा सुरू करू शकलो, आज 10-12 जणांना काम दिले आहे."

‘दोन्ही वेळेस निष्पाप नागरिकांचा जीव गेला’

1984 चे दंगल पिडीत कुटुंब या भागात राहतात का ? या प्रश्नावर गुरमीत यांनी सांगितले की, "अनेकजण इथेच राहतात. थांबा त्यांना बोलवतो." थेड्या वेळात दोन महिला आल्या. आम्ही आमचा परिचय देत 1984 आणि 2020 च्या दंगलींबद्दल विचारल्यावर त्या म्हणाल्या की, "त्यावेळेस आणि आता कोणत्या नेत्याचा मृत्यू झाला नाही. दोन्ही वेळेस फक्त नागरिकांचा जीव गेला आहे. आम्हाला ते दिवस आठवायचे नाहीत, पण आताची दंगल पाहून त्या जुन्या आठवणी ताज्या होतात. त्या वेळेस फक्त शिखांना टार्गेट केले होते, पण आता हिंदू आणि मुस्लिमांनाही मारले आहे."

पुढे महिलांनी हेदेखील सांगितले की, दंगलखोर बाहेरुन आले होते. एकहीजण ओळखीचा दिसत नव्हता. दंगलखोर आले आणि आपलं काम करुन गेले. त्यानंतर इथे राहण्याची हिम्मत कशी आली ? या प्रश्नावर त्या म्हणाल्या की, काही पंडितांचे घरे होती. त्यांनी आम्हाला आसरा दिला. आम्ही हिंदू-मुस्लीम अशा भेदभाव करत नाहीत. जेव्हा दंगलखोर आमच्या परिसरातील दुकान जाळण्यासाठी आले, तेव्हा आम्ही त्यांना हकलून लावले.

तुम्हाला भीती नाही वाटली? या प्रश्नावर महिला म्हणाल्या की, आता भीती निघून गेली आहे. अनेक वर्षे भीतीमध्ये काढली. आमच्या सांगण्यावरुन दंगलखोर पळून गेले, पण नंतर कोणीतरी त्यांना परत भडकवले आणि ते दुकान जाळून पळून गेले. लोकांच्या मनातून भीती कशी जाईल ? या प्रश्नावर त्या म्हणाल्या की, सर्वांनी सोबत मिळून राहिल्यावर भीती राहणार नाही आणि कोणाची हिम्मत होणार नाही.

‘ताहिरच्या बिल्डिंगवरुन मृत्यू पाहिला’

खजूरी खासवरुन आम्ही मूंगा नगरमधील किराना दुकान चालवणारे सुंदरलाल भेटले. 84 च्या दंगलीवर विचारल्यावर ते म्हणाले की, जे दृष्य आता पाहीले आहे, त्यासमोर 1984 आणि 1992 च्या दंगली काहीच नाहीत. तेव्हा मी दिल्ली क्लॉथ मार्केटमध्ये नोकरी करत होतो. जेव्हा इंदिरा गांधींची हत्या झाली, तेव्हा आम्ही कामावरुन परत येत होतोत. आमच्या परिसरात जास्त शिख समाजाचे लोक राहत नव्हते, पण भजनपूरा परसरातील शिखांची दुकाने जाळण्यात आली. आमच्या गल्लीत एक शिख कुटुंब होते, त्यांना आम्ही वाचवले.
सुंदरलालने सांगितल्यानुसार, ताहिरच्या बिल्डिंगवरुन मी कधीही न विसरू शकणारे दृष्य पाहीले. हिंदूकडे हत्यार नव्हते, पण ताहिरच्या बिल्डिंगवर गुलेलसोबत दगड आणि अॅसिडदेखील होते. त्याच्या बिल्डींगवरुन गोळ्यादेखील चालवण्यात आल्या होत्या. हल्ले दोन्हीकडून होत होते, पण त्याच्या बिल्डींगवरुन गोळीबार झाला. ते माझीही दुकान जाळण्याच्या प्रयत्न करत होते, पण शटर उघडू शकले नाही.

‘ते कुठून आले होते, माहित नाही’

यानंतर आम्ही खजूरी खास परिसरात गेलो, तिथे मुस्लीम समाजाचे काही लोक भेटले. येथील मोहम्मद साबिरने सांगितले की, 1984 मध्ये आणि आजही मानवतेची हत्या करण्यात आली. दोन्ही वेळेस कधीही न विसरता येणारे दृष्य पाहीले आहेत. हे कोण लोक होते, कुठून आले होते, माहिती नाही. आमची इच्छा आहे की, सर्वत्र शांती राहावी.
 

बातम्या आणखी आहेत...