Home | Khabrein Jara Hat Ke | People say that ... you are very weak ... we don't want weak firefighter, but gym changed her life

लोक म्हणत असत... तू खूप अशक्त आहेस... आम्हाला किडमिडीत फायर फायटर नको, जिमने बदलले जीवन

वृत्तसंस्था, | Update - Jul 11, 2019, 10:56 AM IST

दोन मुलांच्या जन्मानंतर प्रेस्ले पिकॉर्ड यांनी जिममध्ये वेटलिफ्टिंग करून शरीर मजबूत केले, प्रत्येक धोकादायक आव्हान सर्वप्रथम पेलते

  • People say that ... you are very weak ... we don't want weak firefighter, but gym changed her life

    वॉशिंग्टन - प्रेस्ले प्रिकॉर्ड यांनी फायर फायटर होण्याचा निर्णय घेतला. तेव्हा लोकांनी तिच्या निर्णयास विरोध दर्शवला. हे काम खूप अवघड असते. तू तर अशी अशक्त अाहेस. त्यामुळे हे काम तुला जमणार नाही, असे ते म्हणत. लोकांना आपला निर्णय योग्य असल्याचे पटवून देण्यासाठी तिने जिममध्ये जाऊन वेटलिफ्टिंग सुरू केली. २० व्या वर्षीच ती पॅरामेडिक फायर फायटर झाली. ती आगीने वेढलेल्या इमारतीतून लोकांचा जीव वाचवते, तेव्हा तिचे टीकाकार आश्चर्यचकित होतात. प्रेस्ले मुलांना डेट करण्यासाठी अग्निशमन दलात जाऊ इच्छिते, असे लाेक म्हणत असत. तिला दोन मुले आहेत. इन्स्टाग्रामवर आपले फोटो शेअर करून इतर मुलींना तुम्ही मजबूत होऊ शकता, असा संदेश देते. तिचे इन्स्टाग्रामवर ६० हजार फॉलोअर्स आहेत.

    मुलींचा स्वत:वर विश्वास असेल तर समस्या चुटकीसरशी सुटतील

    प्रेस्ले म्हणाली, मी पहिल्यांदा नोकरीसाठी आले तेव्हा लोकांनी मला किडमिडीत मुलगी समजले. मला काम करण्यापेक्षा डेटिंग करण्याची आवड आहे, असा त्यांचा गैरसमज होता. पुरुषांचे वर्चस्व असलेल्या नोकरीत स्वत:चे स्थान तयार करणे सोपे काम नाही. त्यामुळे मला एक किरकोळ, अशक्त मुलगी समजले जात असे. त्यामुळे त्यांचा हा गैरसमज दूर करण्याचा निर्णय घेतला. वयाच्या १८ व्या वर्षी मला पहिला मुलगा झाला. त्यानंतर दाेन आठवड्यांनी माझे हायस्कूलचे शिक्षण पूर्ण झाले. त्यानंतर माझे स्नायू कमजाेर झाले होते. दुसऱ्याच वर्षी मला मुलगी झाली. त्यानंतर मात्र मी वेटलिफ्टिंग सुरू केली. पूर्वीपेक्षा मी खूप सशक्त झाले. कोणी किरकोळ समजू नये म्हणून आता नोकरीत सर्वात अवघड कामगिरी घेते. आमच्या फायर अकादमीच्या प्रशिक्षणात डोळ्यांवर पट्टी बांधून ९५ किलोची डमी अंधारात शोधून काढावी लागते. हे काम खूप अवघड असते, परंतु मला ते सहज जमले.
    प्रेस्ले सांगते, इन्स्टाग्रामवरील माझ्या व्हिडिओला दहा हजारांहून अधिक लाइक्स मिळतात, तर आम्ही तुझ्यासारख्या सशक्त कशा बनू शकतो, अशी विचारणा मुली करत असतात. यावर प्रेस्ले सांगते, तुमचा स्वत:वर विश्वास बाळगा. वाट्टेल तशी विपरीत परिस्थिती निर्माण झाली तरी जगात आपण कोणतेही अवघड काम करू शकतो, याची खात्री मनात असू द्या. माझ्याकडून प्रेरणा घेऊन अग्निशमन दलात महिला मोठ्या संख्येने दाखल होतील, असे तिने म्हटले. मुली धोका पत्करू शकत नाहीत, हा समज खोटा ठरवण्यासाठी मुलींनी या क्षेत्रात आले पाहिजे, असे तिचे आवाहन आहे.

Trending