आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑस्ट्रेलियाच्या समुद्रकिनारी वाहून आला रहस्यमयी जीव, शास्त्रज्ञही शोधू शकले नाही नेमके काय आहे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेलबोर्न - वेस्ट ऑस्ट्रेलियाच्या एखा बीचवर लोकांना एक रहस्यमयी जीव आढळला. त्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे. विशेष म्हणजे एकाही तज्ज्ञाला हे शोधता आले नाही की, हा जीव नेमका कोणता आहे. त्यामुळे लोकांनी त्याबाबत अंदाज लावण्यास सुरुवात केली. अनेकांनी तर हा जीव दुसऱ्या जगातील असल्याचे म्हटले आहे. 

 

एका तरुणीने सर्वात आधी हा फोटो पोस्ट केला. Reddit डॉट कॉम वर तिने या फोटोसह लिहिले, मी आई आणि मित्रासह बीचवर गेले होते. त्याठिकाणी हा जीव आढळला. रिपोर्ट्सनुसार तरुणीने जेव्हा लोकल पोलिसांना याबाबत माहिती दिली, तेव्हा एक्सपर्ट्सची टीमही तेथे आली. पण हा प्राणी नेमका कोणता हे कोणालाही समजत नव्हते. लोक सोशल मीडियावर विविध कमेंट्स करत आहेत. कोणी हा दुसऱ्या जगातील जीव असल्याचे म्हणत आहेत, तर कोणी हा एलियनचा एखादा अवयव असावा असा कयास लावत आहेत. 


समुद्री जीव असावा?
पश्चिमी ऑस्ट्रेलियाच्या ब्रूम समुद्र किनाऱ्यावर आढळलेला हा जीव काही लोकांनी ओळखलाही आहे. काही लोकांचे असे म्हणणे आहे की, हे Armed Anemone (आर्म्ड एनीमोन) आहे. ते 2 फुटांपर्यंत लांब असते. एखाद्याला हा जीव चावला तर त्याला बरा होण्यास अनेक महिने लागतात, पॅरालिसीस होऊ शकतो, असेही सांगितले जात आहे. हा अत्यंत विषारी असतो. स्थानिक तज्ज्ञांनी म्हटले आहे की, तपास केल्यानंतरच सांगता येईल की, हा जीव नेमका काय आहे. 


ब्रिटनमध्येही आढळला होता 
यापूर्वी सप्टेंबर महिन्यात एका ब्रिटिश व्यक्तीलाही एका बीचवर अशा जीव आढळला होता. लिव्हरपूलमध्ये राहणाऱ्या अॅडम डिकिनसन नावाच्या व्यक्तीने न्यूझीलंडच्या बीचवर हा रहस्यमयी जीव पाहिला होता. तो लायन मेन जेलिफिश असल्याचे नंतर समजले होते. ही जगातील जेलीफिशची सर्वात मोठी प्रजाती आहे. 

बातम्या आणखी आहेत...