आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Ice Age: फ्लश करतानाच गोठतेय गरम पाणी, अमेरिकेतील थंडीचे वास्तव मांडणारे Videos

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - अमेरिकेत थंडीने आतापर्यंतचे सर्वच विक्रम मोडले आहेत. देशातील सरासरी तापमान -29 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले. तर काही ठिकाणी तापमान -70 अंश सेल्सिअस असल्याची देखील नोंद झाली. या थंडीत लोकांचे घराबाहेर पडणे कठिण झाले. बाहेर असताना शरीराचा एक इंचही भाग उघडा असेल तर फ्रॉस्ट बाइट अर्थात शीतदंश बसण्याचा धोका आहे. परंतु, इतक्या जहरी थंडीतही लोकांनी एन्जॉय करण्याचा आप-आपला मार्ग निवडला आहे. यात सर्वाधिक व्हिडिओ गरम पाणी पाण्यात फेकण्याचे पोस्ट केले जात आहेत. गरम पाणी पाण्यात फेकताच थंड वाफ होऊन खाली पडत आहे. तर काहींनी यापेक्षा वेगळे मार्ग निवडले. त्यात एका तरुणीने ओल्या केसांवर केलेला प्रयोग आणि एका महिलेने ट्वीट केलेला टॉयलेटच्या फ्लशचा फोटो सोशल मीडियावर सुपरहिट ठरले आहेत.


ओल्या केसांसह बाहेर पडली तरुणी
अमेरिकेत राहणारी टेलर स्कॅलन हिने आपल्या केसांवर केलेला प्रयोग सोशल मीडियावर व्हायरल ठरला आहे. तिने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये टेलर ओल्या केसांसह घराबाहेर गेली. तिने आपले ओले केस हवेत झटकण्याचा प्रयत्न केला. तिचे केस डोक्यावर उभे झाले आणि खाली आलेच नाही. तशाच अवस्थेत आणि बदललेल्या हेअरस्टाइलचा व्हिडिओ करून तिने ट्वीट केला. हा व्हिडिओ आतापर्यंत 30 लाख लोकांनी पाहिला असून पाहणाऱ्यांची संख्या वाढतच आहे.

 

“Is Iowa really THAT cold?” pic.twitter.com/htxSZzy2QB

— Taylor Scallon (@taylor_scallon) January 31, 2019


फ्लश करताना गोठले पाणी
दुसऱ्याने शेअर केलेला फोटो पाहून लोकांनी आपल्या डोक्याला हात लावला. काहींना तर या फोटोवर विश्वास बसेनासे झाले आहे. अमेरिकेत गीझर आणि हीटरशिवाय पाणी वापरणे शक्यच नाही. तरीही त्याने आपल्या टॉयलेटमध्ये पाणी फ्लश केल्यानंतर काय झाले याचा फोटो शेअर केला. फ्लश करताना पाणीच गोठल्याचे या फोटोमध्ये दिसून येते.

 

 

It's soooo cold! how cold is it? it's sooo cold that this is happening! pic.twitter.com/uloTK26BJA

— Colin Lovequist (@LoungeCKRM) January 29, 2019

 

 

 

At -29 it’s officially cold enough to turn boiling water into snow! pic.twitter.com/FkGb3MmQoj

— Christopher Ingraham (@_cingraham) January 29, 2019

 

 

बातम्या आणखी आहेत...