आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भोजनावेळी मौन बाळगा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कथा सिद्धार्थांच्या जीवनाशी निगडित आहे. तेव्हा ते बुद्धत्वाला गेले नव्हते आणि ते निरंजना नदीच्या काठी जंगलात वृक्षाखाली ध्यान करीत होते. सिद्धार्थ प्रत्येक दिवशी ध्यान केल्यानंतर जवळच्या गावात जाऊन भिक्षा मागून येत असत. काही दिवसांनंतर त्यांनी भिक्षा मागायला जाणे सोडून दिले. कारण एका गावात गाव प्रधानाची छोटी मुलगी सुजाता त्यांच्यासाठी नित्य भोजन आणत असे. सिद्धार्थांना ती मोठ्या प्रेमाने भोजन देत असे. काही दिवसांनंतर त्याच गावातला एक गुराखीही प्रभावित होऊन सिद्धार्थांकडे येऊ लागला. त्याचे नाव स्वस्ती होते. एके दिवशी स्वस्तीशी सिद्धार्थ चर्चा करीत होते. तेवढ्यात सुजाता भोजन घेऊन आली. भोजन सुरू करताच त्यांनी चर्चा बंद केली. भोजन संपेपर्यंत ते गप्प राहिले आणि तेथे शांतता पसरली. स्वस्ती हैराण झाला. त्याने सिद्धार्थांचे भोजन आटोपल्यानंतर विचारले, गुरुदेव! मी आल्यानंतर आपण भरपूर चर्चा केली, परंतु भोजनाच्या वेळी आपण एक शब्दही बोलला नाहीत. याचे काय कारण आहे? सिद्धार्थ म्हणाले, भोजननिर्मिती मोठ्या कष्टाने होते. शेतकरी आधी बी पेरतो, रोपांची देखरेख करतो आणि त्यानंतर अन्न तयार होते. मग घरातील महिला भोजन तयार करते. इतक्या कष्टाने तयार झालेल्या भोजनाचा आनंद तेव्हाच मिळतो, जेव्हा आपण मौन बाळगू. त्यामुळे मी भोजनाच्या वेळी मौन बाळगून त्याचा आनंद घेतो. तात्पर्य, शांततेत केलेले भोजन न केवळ शारीरिक भूक मिटवते, तर मानसिक आनंद आणि सात्त्विक ऊर्जाही देते.