Home | Khabrein Jara Hat Ke | people thought I was pregnant but diagnosed with germ cell ovarian cancer

19 वर्षांच्या मुलीच्या पोटात खूप दुखायचे, मग अचानक वाढू लागली साइज, सतत यूरिन पास करायला जावे लागायचे, मित्र आणि डॉक्टरला वाटले प्रेग्नन्सीच आहे, पण मुलगी मानायला तयार नव्हती

दिव्य मराठी वेब टीम  | Update - Apr 15, 2019, 12:58 PM IST

शेवटी मुलीची शंकाच निघाली खरी, पोटात वाढत होते मृत्यूचे कारण... 

 • people thought I was pregnant but diagnosed with germ cell ovarian cancer

  नॉरविच : इंग्लंडमध्ये राहणाऱ्या एका मुलीला एक भयंकर आजार झाला होता ही गोष्ट तिने जगासोबत शेयर केली आहे. मुलीचे पोट अचानक दुखू लागले आणि तिच्या पोटाची साईज वाढू लागली. एवढेच नाही, तिला सतत यूरिन पास करायला जावे लागत होते. त्यामुळे तिला रात्र रात्र जगायला लागायचे. मित्रांनी प्रेनग्नसीची शंका वर्तवली. डॉक्टरनेदेखील हीच शक्यता सांगून टेस्ट करण्याचा सल्ला दिला. निगेटिव आल्यावरही डॉक्टर मानले नाहीत. जेव्हा वेदना खूप जास्त वाढल्या तेव्हा तिचे पोट स्कॅन केले गेले. यामध्ये सर्वात आधी पोटात गाठ असल्याचे कळले, मग जर्म सेल ओवेरियन कॅन्सर असल्याचे कळाले.

  मित्र आणि डॉक्टरला वाटायचे प्रेग्नन्सी...
  - नॉरविचची राहणारी एबी क्रेसवेलने सांगितले, डिसेंबर 2017 मध्ये तिच्या पोटात सतत दुखू लागले, तेव्हा माझे वय 19 वर्षे होते आणि बेडफोर्डशायर यूनिवर्सिटीमध्ये डान्स शिकत होते.
  - एबीनुसार, माझ्या पोटात एवढे दुखायचे की, मला क्लास अटेन्ड करणेदेखील कठीण झाले होते. अनेकदा त्रास इतका भयानक असायचा की, मला रूटीन काम करणेदेखील कठीण होते.
  - दुखण्यासोबतच एबीचे पोटही मोठे होत होते. पोट एवढे मोठे दिसायचे की, ती प्रेग्नन्ट असल्यासारखी दिसायची.
  - एबीला प्रत्येक थोड्या वेळाने यूरिन पास करावे लागायचे. अशात मग ती घराबाहेर पडल्यावर तिला लगेच अप्सपासच्या ठिकाणी टॉयलेट शोधायची.
  - एबीनुसार, ती मानायलाच तयार नव्हती की, ती प्रेग्नन्ट झाली आहे.
  - तिच्या पोटाची साइज पाहून डॉक्टर्सने तिची प्रेग्नन्सी टेस्ट केली होती आणि तिला पेन रिलीफची औषधीही दिली होती.

  अनेक महिन्यांनंतर केले अल्ट्रासाउंड
  - एबीनुसार, हे काही सामान्य नव्हते. अनेक महिन्यांनंतर त्रास असह्य झाल्यावर डॉक्टरने अल्ट्रासाउंड करण्यासाठी तिला हॉस्पिटलमध्ये रेफर केले.
  - तिथे अल्ट्रासाउंडमध्ये कळाले की, पोटात एक मोठी गाठ आहे. ज्याला सर्जरी करून काढले जाऊ शकते. एबी यासाठीही तयार होती.
  - मात्र डॉक्टर्स याबद्दल कहीही बोलायला तयार नव्हते कि, ही गाठ कशामुळे झाली आहे. डॉक्टर्सचे म्हणणे आहे होते की, ऑपरेशननंतर काही कळू शकेल.

  2.2 किलोचे निघाले ट्यूमर, कॅन्सरबद्दल कळले...
  - एबीच्या सर्जरीमध्ये 2.2 किलोचा एका ट्यूमर निघाला. जेव्हा तो टेस्टिंगसाठी पाठवला गेला. तेव्हा कळाले की, ती जर्म सेल ओवेरियन कॅन्सरचा सामना करत आहे.
  - डॉक्टर्सने दिलासा दिला की, उपचाराने हा कॅन्सर 90 टक्के बारा होऊन जाईल. मागच्यावर्षी ऑगस्टमध्ये एबीची कीमोथेरपी सुरु झाली.
  - कीमोच्या पाच दिवसांच्या चार सायकल आणि एका एका आठवड्याच्या सायकल नंतर एबीला कळाले की, तिने कॅन्सरचे युद्ध जिंकले आहे.

 • people thought I was pregnant but diagnosed with germ cell ovarian cancer
 • people thought I was pregnant but diagnosed with germ cell ovarian cancer
 • people thought I was pregnant but diagnosed with germ cell ovarian cancer

Trending