आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जरीन खानचे पोट पाहून लोक म्हणाले - 'उलटी होईल' अभिनेत्रीने ट्रोलर्सला दिले सडेतोड उत्तर 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : अभिनेत्री जरीन खानने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला. जरीन सध्या उदयपुरमध्ये आहे. जिथून तिने एकानंतर एक आपले दोन फोटोज शेअर केले. या फोटोमध्ये जरीनचे पोट जसे दिसत होते त्यामुळे लोकांनी कमेंट्स करून बाॅडी शेमिंगची शिकार बनवण्याचा प्रयत्न केला. पण जरीनने या ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देऊन त्यांचे तोंड बंद केले आहे.  
 

स्टोरीवर शेअर केले स्क्रीन शाॅट्स... 
जरीनने फोटोवर विचित्र कमेंट्स करणाऱ्या यूजर्सच्या कमेंटचा स्क्रीन शॉट घेऊन आपल्या इंस्टास्टोरीवर शेअर केला. ज्यामध्ये लोकांनी तिच्या पोटाची खिल्ली उडवली होती. कुणी स्ट्रेच मार्क्स म्हणाले तर कुणी लिहिले होते की, पोट पाहून उलटी होईल. मात्र यादरम्यान काही लोकांनी हेदेखील लिहिले की, वजन कमी केल्यानंतर बॉडी अशी होते.  
 

जरीनने घटवले 50 किलो वजन... 
स्क्रीन शॉट्स शेअर केल्यानंतर जरीनने एक नोट लिहिली - ज्या लोकांना हे जाणून घेण्याची उत्सुकता होती की, अखेर माझ्या पोटाला काय झाले आहे, हे त्यांच्यासाठी आहे. हे एका अशा व्यक्तीचे स्वाभाविक पोट आहे, जिने 50 KG पेक्षा जास्त वजन कमी केले. हे असेच दिसते, मात्र हे ना फोटोशॉप केले आहे आणि ना कोणत्याही प्रकारचे एखादे ऑपरेशन केले गेले आहे. मी त्यांच्यापैकी आहे जी सत्यावर विश्वास ठेवते. हे झाकण्याऐवजी गर्वाने मी माझ्या कमतरता स्वीकारल्या आहेत.  
 

चित्रपट लॉटरी ट्रॅकवर...  
जरीन उदयपुरमध्ये अंशुमन झा याच्यासोबत रोम-कॉम ‘हम भी अकेले तुम भी अकेले’ चे शेवटचे शेड्यूल शूट करण्यासाठी पुन्हा पोहोचली होती. हरीश व्यास दिग्दर्शित या चित्रपटात चित्रपटाचे शूटिंग खूप कायदेशीर लढाईनंतर पुन्हा शेड्यूल केले गेले आहे. चित्रपटाचे शूटिंग काही महिन्यांपूर्वी हिमाचल प्रदेशच्या धर्मशाळेत झाले होते. पण याचे डीओपी आणि कॅमेरा सप्लायरने तीन दिवसांचे शूटिंग फुटेज हरवले, ज्याची तक्रार त्या दिवशी दिंडोशी पोलीस स्टेशनमध्ये केली गेली होती. हा चित्रपट 14 फेब्रुवारी 2020 ला रिलीज केला जाईल. 

बातम्या आणखी आहेत...