Home | News | People used to tell me in childhood that you walk like a girl: Karan Johar

रियालिटी शोमध्ये लेस्बियन मुलीने ऐकवली आपली व्यथा, इमोशनल झाला करण जोहर म्हणाला- बालपणी लोक मला असे म्हणायचे

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 11, 2018, 11:33 AM IST

करण जोहरची बायोग्राफी 'ऐन अनसूटेबल बॉय'मध्ये त्याने सेक्शुअल लाइफवर खुलेपणाने चर्चा केली आहे.

 • People used to tell me in childhood that you walk like a girl: Karan Johar

  मुंबई. रियलिटी शो 'इंडियाज गॉट टॅलेंट'मध्ये कोलकाता बेस्ड बिदिशा मोहनता नावाच्या सिंगरने उपस्थिती लावली. नुकत्याच एका एपिसोडमध्ये बिदिशाने ती लेस्बियन असल्याचे सांगितले. बिदिशाने परफॉर्मेंस दरम्यान आपली एक व्हिडिओ डायरी दाखवली आणि सांगितले की, तिच्या पालकांनी तिच्या मुलींसोबतच्या नात्याला कधीच स्विकारले नाही. यामुळे तिला नेहमीच निंदेचा सामना करावा लागला.


  इमोशनल झाला करण जोहर
  - बिदिशाची स्टोरी ऐकल्यानंतर शोचा जज करण जोहर इमोशनल झाला. तो म्हणाला की, जे लोक स्वतःला स्ट्रेट आहे असे म्हणतात. ते खुप वाकड्यात शिरतात. करण म्हणाला "बालपणी लोक मला म्हणायचे की, मी मुलींसारखा चालतो. पण मी माझी चाल बदलू शकलो नाही. मी त्यांच्यासमोर पुढे आलो, माझ्या करिअरमध्ये पुढे गेलो. यामुळे आज येथे आहे. लोक म्हणतात की, मुलींप्रमाणे रडू नको. मुलांप्रमाणे राहा. पण हे सर्व बकवास आहे. तुम्ही जसे आहात, तसेच राहा. स्वतःवर अभिमान बाळगा. मला स्वतःवर आणि माझ्या चॉइसवर अभिमान आहे." या दरम्यान मलायकाने बिदिशाला सपोर्ट केला. ती म्हणाली. "मला हेच म्हणायचे आहे की, माझ्या अनेक फ्रेंड्स लेस्बियन आहेत आणि मी त्यांच्यावर खुप प्रेम करते. तुम्ही काहीही असाल तरीही स्वतःवर अभिमान बाळगा." यानंतर शोच्या जजने बिदिशाला मिठी मारली.

  सेक्शुअल ओरिएंटेशनवर यापुर्वीही बोलला आहे करण
  - आपल्या सेक्शुअल ओरिएंटेशनवर करण यापुर्वीही बोलला आहे. नोव्हेंबर 2017 मध्ये एका साहित्यिक कार्यक्रमादरम्यान तो आपल्या सेक्शुअल ओरिएंटेशनवर मोकळेपणाने बोलला होता. तो म्हणाला होता, "मी जसा आहे, त्यावर मला अभिमान आहे. मला याविषयी काही बोलायचे होते, ते मी माझ्या 'ऐन अनसूटेबल बॉय'मध्ये बोललो आहे. यामध्ये जे लिहिले आहे ते सत्य आहे. अनेक लोक म्हणतात की, मी यामध्ये पुर्ण का लिहिले नाही, पण हा माझा अधिकार आहे मी का लिहू. यामुळे मला खुप ट्रोल करण्यात आले. पाउटचा सेल्फी टाकला तर त्यावर मला हजार कमेंट यायचे. मी जसा आहे तसा आहे."

  बुकमध्ये लिहिले - सेक्शुअल रिलेशन बनवल्यानंतर गिल्टी फील होत होते
  - करण जोहरची बायोग्राफी 'ऐन अनसूटेबल बॉय'मध्ये त्याने सेक्शुअल लाइफवर खुलेपणाने चर्चा केली आहे. करण जोहरने आपल्या बायोग्राफीमध्ये सांगितले की, त्याने 26 वर्षांच्या वयामध्ये आपली व्हर्जिनिटी लूज केली होती. पण त्याला यावर गर्व नव्हता. कारण त्या वयात फक्त सेक्शुअल लाइफचा अनुभव घ्यायचा होता. यामुळे त्याने न्यूयॉर्कमध्ये पैसे दिले होते. करण म्हणाला की, या अनुभवाने त्याला खुप चिंतित केले. करणने त्यावेळी दोन वेळा संबंध बनवले होते. पहिल्यांदा जेव्हा त्याने पैसे दिले, तेव्हा तो पुर्णपणे सेक्शुअल रिलेशन बनवू शकला नव्हता. मग एका आठवड्यानंतर, तो पुन्हा तिथेच गेला. पण यावेळी त्याला गिल्टी फील होत होते.


  - करणने बुकमध्ये लिहिले की, "मला संबंध बनवून चांगले वाटले नाही. कारण मला स्टूपिडिटी टाइफ फील होत होते. हे सर्व खोटे होते, कारण आर्टिफिशियल आनंद मिळाव यासाठी मी हे सर्व करण्यासाठी पैसे दिले होते. लोकांना वाटते की, मी खुप जास्त ट्रॅव्हल करतो, यामुळे जास्त संबंध बनवत असेल. पण असे काहीच नाही. मी बोर्डिंगमधून पास झालो आहे, सेक्शुअल एज्यूकेशनमधून नाही. मी आता कुणाच्याही प्रेमात नाही." करणने पुढे लिहिले की, "माझ्या आणि माझ्या वडिलांच्या वयामध्ये मोठे अंतर होते. मला त्यांच्याशिवाय याविषयी सांगणार कोणीही नव्हती. मला मर्यादित मित्र होते. यामध्ये लिमिटेड गर्ल आणि बॉय होते. माझा एक गुजराती मित्रांचा ग्रुप होता, ते नेहमीच पिकनिकला जायचे. आम्ही सर्व अनकूल, अनअवेयर आणि इनोसेंट होतो."

  बुकमध्ये शाहरुखसोबत रिलेशनशिपवरीही लिहिले
  - करणनने आपल्या बायोग्राफीमध्ये शाहरुख खानसोबतच्या मैत्रीवर एक चॅप्टर लिहिला आहे. यामध्ये तो शाहरुख आणि त्याच्या नात्याविषयी खुलून बोलला. करण म्हणाला - "अनेक वर्षांपासून शाहरुख आणि माझ्या नात्याविषयी अफवा पसरत होत्या. यामुळे मी टेंशनमध्ये राहायचो. मी एका हिंदी चॅनलच्या शोमध्ये गेलो. तिथे मला पुन्हा एकदा शाहरुखविषयी विचारण्यात आले. मुलाखत घेणारा मला म्हणाला की - तुमचे नाते अनोखे आहे. तो असं बोलल्यामुळे मला खरंच राग आला. मी म्हणालो. जर तुला मी म्हटलो की, तु तुझ्या भावासोबत झोपतो, तर तुला कसे वाटेल? तो म्हणाला, तुझ्या बोलण्याचा अर्थ काय आहे? तुम्ही मला हे सर्व कसे म्हणू शकता? मग मी म्हणालो, तु मला अशा प्रकारे कसे प्रश्न विचारु शकतो? आता मी या सर्व गोष्टींना सिरियसली घेत नाही. माझ्यासाठी शाहरुख हा वडील आणि मोठ्या भावासमान आहे. अशा प्रकारच्या अफया हास्यास्पद आहेत. मी या सर्वांमुळे आता टेंशन घेत नाही. लोक अशा वायफळ गोष्टी बोलत असतात. शाहरुखविषयी करण बोलला की, जर कुणाचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर नसेल, तर लोक त्याला गे मानतात."

Trending