• Home
  • people wants to marry in Japan do not get married

Japan / जपानमध्ये विवाहेच्छुक ४७% लोकांना मिळत नाहीत मनासारखे जोडीदार ; सरकारच्या कॅबिनेट विभागाच्या पाहणीत निघालेले निष्कर्ष

जोडीदार शोधण्यासाठी लोकांकडे नाही वेळ , ज्येष्ठांची वाढती संख्या राष्ट्रीय समस्या : पीएम
 

वृत्तसंस्था

Jun 24,2019 11:02:00 AM IST

टोकियो - जपानमध्ये एक अजब समस्या निर्माण झाली आहे. तेथे विवाह करू इच्छिणाऱ्या सुमारे ४७% तरुण-तरुणींना मनासारखा जोडीदार मिळत नाही. त्यांच्याकडे जोडीदार शोधण्यासाठी वेळ नाही, हे एक कारण सांगण्यात येते. सरकारी सर्व्हेत ही आकडेवारी निष्पन्न झाली आहे. याच्या ऑनलाइन सर्व्हेमध्ये २० ते ४० वर्षे वयातील ४ हजार पुरुष व महिलांनी सहभाग घेतला. यापैकी ४७% लोकांनी सांगितले की, लग्नासाठी अाम्ही योग्य जोडीदार शोधण्यात अपयशी ठरले आहेत. या अहवालात जपानच्या घटत्या जन्मदराचाही उल्लेख आहे. सर्व्हेत सहभागी झालेल्या २९ टक्के लोकांनी सांगितले, आमच्याकडे लग्न करण्याइतपत पैसे नाहीत, तर बहुतांश लोकांनी म्हटले, जोडीदार शोधण्यासाठी वेळच मिळाला नाही. आम्हाला स्वातंत्र्य हवे आहे. बंधनात राहणे आवडत नाही. यामुळे आम्ही लग्न करणार नाही, असे ३१ % तरुणींनी सांगितले.

ज्येष्ठांची वाढती संख्या राष्ट्रीय समस्या : पीएम

जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबे यांनी देशातील ज्येष्ठांची वाढती संख्या ही समस्या असल्याचे म्हटले आहे. आम्ही लोकांनी मुले जन्माला घालावीत म्हणून प्रोत्साहन योजना लागू करत आहाेत. जपानमधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पॉप्युलेशन अँड सोशल सिक्युरिटी रिसर्चच्या अंदाजानुसार २०४२ मध्ये ज्येष्ठांची संख्या (६५ व त्यावरील वयांची मंडळी)३ कोटी ९५ लाख होईल.

X
COMMENT