आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#MeToo : स्क्रिप्टमध्ये कुठेही नव्हता रेप सीन, डायरेक्टरने अचानक शूटिंगच्या वेळी 19 वर्षीय अॅक्ट्रेसला सांगितले, सीन पाहून लोक म्हणाले - हा तर खरोखरचा रेप होता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लॉस एंजिलिस - बॉलीवूडमध्ये सध्या #MeToo कॅम्पेन चर्चेचा विषय बनला आहे. अनेक फिमेल सेलिब्रिटींनी याप्रकरणी आपल्यासोबत घडलेल्या सेक्शुअल हरॅसमेंटच्या घटनेचा खुलासा केलेला आहे. बहुतेकांना माहिती नाही की, हॉलीवूड अॅक्ट्रेस मारिया श्नाइडरसोबत 46 वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या 'लास्ट टँगो इन पॅरिस' चित्रपटादरम्यान एका सीनमध्ये रेपसारखी घटना झाली होती. 1972 मध्ये रिलीज झालेला हा चित्रपट 2016 मध्ये अचानक वादग्रस्त ठरला. वास्तविक, चित्रपटाचे डिरेक्टर बर्नार्डो बेर्तोलुची ( Bernardo Bertolucc) यांनी एका इंटरव्यूदरम्यान हे स्वीकारले होते की, त्यांनी चित्रपटाचा रेप सीन लीड अॅक्ट्रेस मारिया श्नाइडरच्या मर्जीविरुद्ध शूट केला होता. डायरेक्टरच्या मते, सीन रिअॅलिस्टिक बनवण्यासाठी त्यांनी असे केले. 
 
मारियाला वाटले, खरोखरंच तिचा रेप झालाय...
बेर्तोलुची यांचे म्हणणे होते की, रेप सीन त्यांनी अॅक्टर मार्लोन ब्रँडोसोबत डिस्कस केला होता. तथापि, हा प्लॅन त्यांनी मारियाला सांगितलाच नाही. एवढेच नाही, बेर्तोलुची यांच्या मते, सीनची आइडिया भयंकर होती. परंतु त्यांचा याचा बिलकुल पश्चात्ताप नाही. दुसरीकडे, 2007 मध्ये एका इंटरव्यूमध्ये मारियाने स्वीकारले की, त्यांचा खरोखरचा रेप झाला नव्हता. परंतु त्यांची स्वत:ची रेप विक्टिमसारखीच भावना होती. मारियाने सांगितले, "सीन ओरिजिनल स्क्रिप्टचा भाग नव्हता. सत्य हे आहे की, ही मार्लोनची आयडिया होती. त्यांनी मला ऐन वेळेवर सांगितले, जेव्हा आम्ही सीन शूट करण्यासाठी पोहोचलो. मला खूप रागही आला होता.
 
मारियाने हेही सांगितले की, "मी माझ्या एजंट अथवा लॉयरला बोलावले पाहिजे होते. कारण जी गोष्ट स्क्रिप्टमध्ये नाहीये, त्याबद्दल तुम्ही जबरदस्ती करू शकत नाहीत. परंतु तेव्हा मला या गोष्टी माहिती नव्हत्या. मला स्वत:ला अपमानित झाल्यासारखे वाटतेय. प्रामाणिकपणे सांगायचे तर, जणू काही बेर्तोलुची आणि मार्लोन दोघांनी मिळून माझा रेप केला. सीननंतरही ना मार्लोनने मला सहानुभूती दिली, ना माफी मागितली. नशीब की असा सीन एका टेकमध्येच झाला."
 
खुलाशानंतर संतप्त झाले प्रेक्षक
बेर्तोलुची यांनी केलेल्या खुलाशामुळे लोक संतप्त झाले होते. लोकांनी ट्विटरवर त्याच्याविरुद्ध आक्रोश व्यक्त केला. tweets मध्ये लोकांनी स्पष्टपणे म्हटले की, 'लास्ट टँगो इन पॅरिस'मध्ये अॅक्चुअल रेप दाखवण्यात आला होता. तो काही अॅक्टेड सीन नव्हता. हा कधीही पाहिला जाऊ नये. अनेक हॉलीवुड सेलेब्सनीही बेर्तोलुचीच्या खुलाशावर विरोध जाहीर केला होता. अॅक्ट्रेस जेसिका चास्तैन (Jessica Chastain) ने ट्विटरवर लिहिले की, "हा चित्रपट पसंत करणाऱ्या सर्वांसाठी... तुम्ही 48 वर्षीय पुरुषाकडून 19 वर्षीय तरुणीचा रेप पाहत आहात. डिरेक्टरने तिच्यावर अटॅकचा प्लॅन बनवला होता. मला घृणा वाटत आहे." या प्रकारे अॅक्टर क्रिस इवानने लिहिले की, "मला कळत नाहीये की, त्यांना का सोडून दिले. त्यांना तर तुरुंगात डांबायला हवे."
 
2011 मध्ये झालेले आहे मारियाचे निधन
'लास्ट टँगो इन पॅरिस' एका अशा पुरुषाची कहाणी आहे, जो पत्नीच्या सुसाइडनंतर पुन्हा अफेअरमध्ये पडतो. चित्रपट जगतातील हा सर्वात वादग्रस्त चित्रपट मानला जातो. हा रिलीज झाल्याने लोक चकित झाले होते. कारण फिल्ममध्ये सेक्स आणि रेप मूळ रूपात दाखवण्यात आला होता. तथापि, यात मारियाने चित्रपटात जीन नावाच्या मुलीचा रोप प्ले केला होता. तेव्हा तिचे वय 19 वर्षे होते. तर मार्लोन 48 वर्षांचे होते. 3 फेब्रुवारी 2011 रोजी कॅन्सरमुळे वयाच्या 58 व्या वर्षी मारियाचे निधन झाले. तर 2004 मध्ये मार्लोननेही जगाचा निरोप घेतला होता.
 
पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित Video आणि Photos...   
 
 

 

बातम्या आणखी आहेत...