नोकरीसाठी लोक गाव सोडत होते, आता ३६ गावांतील लोकांना मिळू लागला रोजगार
बिहारच्या सिवान शहरापासून १८ किमी अंतरावर पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांची जन्मभूमि जिरादेईमधील नरेंद्रपूर हे
-
पाटणा- बिहारच्या सिवान शहरापासून १८ किमी अंतरावर पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांची जन्मभूमि जिरादेईमधील नरेंद्रपूर हे एक गाव. दहा वर्षांपूर्वी ग्रामस्थांना चांगला रोजगार मिळवण्यासाठी गाव सोडणे एवढाच एक पर्याय असे. परंतु २००९ मध्ये येथे परिवर्तन कॅम्पसची सुरूवात झाली आणि संपूर्ण गावाचे चित्रच पालटले. परिवर्तन कॅम्पसमध्ये महिला-पुरूषांना कौशल्याधारित प्रशिक्षण देणारे केंद्र आहे. त्याच्या जोरावर स्थानिकांना रोजगाराच्या दृष्टीने सक्षम केले जाते. याच कॅम्पसमध्ये मुलांसाठी शाळाही आहे. महिला शिवणकाम करतात. पुरूषांसाठी कृषी शिक्षण आहे.
परिवर्तन कॅम्पसच्या प्रयत्नातून पंचक्राेशीतील ३६ गावांतील ५ हजार लोकांना रोजगार मिळाला आहे. परिवर्तन कॅम्पसची स्थापना लंडनमधून शिक्षण घेतलेल्या सेतिका सिंह यांनी केली. वर्षात कॅम्पसच्या महिलांनी १.३० लाख मीटर कपडे तयार केला . दरवर्षी १० ते १२ हजार मुलांसाठी शालेय गणवेश शिवण्याचे काम करतात. पाटणा, लुधियाना, कोयंबतूर, पुण्यापर्यंत त्याचे गणवेशाचे काम पोहोचले आहे. परिवर्तनला तक्षशिला शैक्षणिक सोसायटीद्वारे निधी मिळतो.
महिला बनवू लागल्या गणवेश, शेतकरी गिरवू लागले आधुनिक शेतीचे धडे
- कॅम्पस ४४ अंगणवाडी केंद्राशी जोडलेले आहे.
- २२ सरकारी शाळांसोबत शिक्षण क्षेत्रात सक्रिय.
- परिवर्तन शेतकरी क्लबची स्थापना.क्लबचे ३५० सदस्य
- ३ हजाराहून अधिक महिला परिवर्तन कॅम्पसच्या संपर्कात.
- परिवर्तन ग्रंथालयात ३ हजाराहून जास्त पुस्तके.
१०० महिलांचे ५ तासांच्या शिफ्टमध्ये काम चालते
परिवर्तन कॅम्पसमध्ये सध्या १०० हून जास्त महिला रोज शिवणकाम, सूत कताई, विणकाम इत्यादी कामे करतात. महिलांसाठी पाच तासांची शिफ्ट आहे. यंदा १२ हजार शालेय गणवेश तयार आहेत. इतर सुमारे ४० हजारावर विविध प्रकारचे कपडे देखील तयार आहेत. जुन्या परंपरेच्या जपणुकीसाठी परिवर्तनने आपला पहिला प्रकल्प हातमाग यंत्राद्वारे सुरू केला होता. आज या केंद्रात १०० पेक्षा जास्त हातमाग यंत्र आहेत. साडी, टॉवेल, चादर इत्यादी त्याद्वारे तयार केले जातात.
दरवर्षी ५ राज्यांतून शिल्पकार येथे येतात
पाटण्यात जन्मलेल्या सेतिका सिंह म्हणाल्या, कॅम्पसमध्ये जीवनाचा प्रत्येक राग-रंग पाहायला मिळतो. येथे मुलांच्या अभ्यासाचा किलबिलाट ऐकू येतो. संगीताचा रियाझ करणाऱ्या तरुण-तरूणींचे सूर कानी पडतात. सूत कातणाऱ्या, कपडे विणणाऱ्या महिला दिसतात. शेतकऱ्यांची कृषीशाळाही भरते. २ ते ३ बालगृहे देखील चालवली जातात. येथे मुले इंग्लिश शिकतात. कॅम्पसमध्ये दरवर्षी कलाकुसरीचा मेळा भरतो. त्यात पाच राज्यांतील शिल्पकार सहभागी होतात.
More From National News
- मी किंवा माझा पक्ष 2019 ची लोकसभा निवडणूक लढवणार नाही; रजनिकांत यांची घोषणा
- Viral video of CRPF Jawan: जखमी जवानाने मांडली हल्ल्याच्या अवघ्या काही सेकंदांपूर्वीची आपबिती, गृहमंत्री म्हणाले, 'हीच आहे समस्या'
- Pulwama Attack: जम्मू-काश्मीरच्या फुटिरतावादी नेत्यांचे संरक्षण काढले, हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर निर्णय