आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणता राजा फक्त छत्रपती शिवाजी महाराज, त्यांची तुलना कुणाशीच होऊ शकत नाही- उदयनराजे भोसले

3 वर्षांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • वादग्रस्त पुस्तकाचा केला तीव्र निषेध, विरोधकांवर सुद्धा चढवला हल्ला
 • महाविकास आघाडीने आपल्या नावातून 'शिव' हा शब्द काढलाच कसा?

पुणे- भाजप नेते जय भगवान गोयल यांच्या वादग्रस्त पुस्तकाने राज्यातील राजकारण चांलेच तापले. त्यानंतर भाजपने पुस्तक मागे घेतले. या दरम्यान, सत्ताधाऱ्यांनी भाजपला आणि शिवाजी महाराजांच्यां वंशजांना चांगलेच धारेवर धरले. त्यानंतर आज माजी खासदार उदयनराजे भासले यांनी पत्रकार परिषद घेऊन जय भगवान गोयलसह राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेवरही हल्ला चढवला.यावेळी उदयनराजे म्हणाले की, शिवाजी महाराजांना संपूर्ण जग आदर्श म्हणून पाहतं. शिवरायांची तुलना अनेकवेळा झाली, लोकांनी बुद्धी गहाण ठेवलीय का माहित नाही, काल-परवाचे पुस्तक पाहून वाईट वाटले. गोयल नावाच्या लेखकाने नरेंद्र मोदींची तुलना छत्रपतींशी केली. महाराष्ट्रात जाऊ द्या, जगात शिवरायांशी कोणाची तुलना होऊ शकत नाही, जाणता राजा म्हणून अलिकडे उपमा दिल्या जातात, मात्र जाणता राजा फक्त आणि फक्त शिवाजी राजा आहे, असे म्हणत उदयनराजेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवरही निशाणा साधला.

काय म्हणाले उदयनराजे?

"सर्वात आधी मी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो. आज पानिपतचा शौर्य दिवस आहे, या युद्धात जे कामी आले त्यांना श्रद्धांजली वाहतो. ही पत्रकार परिषद घेण्यामागे कोणतेही राजकारण नाही, मी कधी राजकारण केलेच नाही आणि करणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कोणाबरोबरही केली जाते आहे, याचे वाईट वाटते. लोकांनी बुद्धी गहाण ठेवली का ते कळत नाही. एकमेव छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले ज्यांची प्रतिमा आपण देवघरात ठेवतो. तुलना तर सोडून द्या पण महाराजांच्या जवळपास सुद्धा जाऊ शकत नाही. शिवाजी महाराजांचे आत्मचरित्र वाचतो, त्यानंतर त्यांच्यासारखे वागायचा प्रयत्न करतो, म्हणून आपण शिवाजी महाराज होऊ शकत नाही. मी राजघराण्यात जन्माला आलो हे माझं सौभाग्य समजतो. आम्ही महाराजांचे वंशज म्हणून कधी नावाचा दुरुपयोग केला नाही. राजेशाही संपल्यावर आम्ही लोकशाही मान्य केलं. सर्व धर्मसमभाव ही कल्पना कुठे गेलीस," असा हल्लाबोल उदयनराजे भोसलेंनी केला.
 

उदयनराजेंच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे

 • शिवसेना काढली तेव्हा वंशजांना विचारलं का?
 • महाशिवआघाडी नाव ठेवले तेव्हा विचारले का?
 • शिव का काढून टाकले? सोईप्रमाणे हे लोक वापर करतात, ही यांची लायकी.
 • शिवसेना भवनावर महाराजांची मूर्ती खाली.
 • राजांनी कधी तू कोणत्या जातीचा, किंवा धर्माचा असे मतभेद केले नाही.
 • सत्तेसाठी कुत्र्यासारखे मागे पळालो नाही.
 • सो कॉल्ड जाणते राजे कोणी त्यांना उपमा दिली माहिती नाही.
 • जाणते राजे म्हणे. राज्याच्या खेळळांडो केलाय, किळस वाटते.
 • शिवसेना नाव काढून टाका ठाकरे सेना करा.
 • महाराजांचं नाव घ्यायचं अन जातीय दंगली घडवून आणायच्या.
 • भिवंडी आठवा, श्रीकृष्ण आयोगाचा अहवाल काय म्हणतो. हे खोटं आहे का?
 • राजेशाही असती तर एकही जण उपाशी राहिला नसता.
 • स्वार्थाने जे लोक एकत्र येतात, ते फार काळ टिकत नाहीत.
 • ह्या सगळ्यांचा राजीनामा घ्या, महाराष्ट्र सुखी होईल.
 • स्वतःला जाणता राजा म्हणून घेण्याचा दुसरा कोणाचा अधिकार नाही.
 • पुस्तकाचा निषेध करतोय, ते माग घेतलयं. माझ्या पोटात एक अन ओठात एक असं नसतं.
 • लोकशाहीने चाललोय, राजेशाहीने चाललो तर गोयल फियल कोण नाही. पुस्तक लांब राहील गोयलला विड्रॉल करेल.
 • कुठं प्रबोधकार ठाकरे? शिवाजी महाराजांचा विसर पडला असेल तर आजोबांचा विचार तरी आठवा.
बातम्या आणखी आहेत...