आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मध्यरात्री रस्ता ओलांडताना दिसली एक भीतीदायक सावली, वेगवान गाड्याही अडवू शकल्या नाहीत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंगासिनान - फिलिपाइन्समध्ये एका रस्ते अपघाताचे भीतीदायक सीसीटिव्ही फुटेज समोर आले आहे. या फुटेजमध्ये रात्रीच्यावेळी एक सावली सारखी गाड्यांसमोर जात असल्याचे दिसतेय. एकापाठोपाठ अनेक गाड्या त्या सावलीला ओलांडून जाताना दिसत आहेत. पण एकही गाडी त्या सावलीला धडकत नाही. उलट गाडी आरपार जाताना दिसत आहे. आजुबाजुचे लोक हा भुताचा प्रकार असल्याचे म्हणत आहेत. 


काय आहे व्हिडिओत.. 
- हा व्हिडिओ पंगासिनान येथील एका रस्त्यावरचा आहे. यात एक सावली दिसते. गाड्यांसमोर ही सावली असा रस्ता ओलांडते जणू तिला समोर कोणीही दिसत नसावे. 
- दुसरीकडे फुटेज पाहून असे वाटतेय की, गाड्यांमध्ये असलेल्या ड्रायव्हरलाही समोर काही दिसत नसावे. कारण ते वेगात गाड्या सावलीच्या आरपार घेऊन जाताना दिसत आहेत. या घटनेनंतर सुमारे 13 तासांनी ही सावली पंगासिनानच्या मिनी मार्ट ग्रॉसरी स्टोरबाहेर एका डिलिव्हरी मॅनजवळ उभी दिसली. 


फुटेज पाहून घाबरले लोक 
- हे सीसीटिव्ही फुटेज जून महिन्यातील आहे. त्यातील सावली भुताची असल्याचे लोकांचे म्हणणे आहे. त्यामुळे लोक प्रचंड घाबरले आहेत. 
- मायकल फोर्टो म्हणाले की, मला स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसत नाही. मला वाटायचे हे फक्त टिव्हीमध्ये होते.  
- दुकानदार जेन्नी रेनाल्टो म्हणाले की, आता मला त्या भागात एकट्याला पायी जायलाही भिती वाटते. मी त्या रस्त्याने जातो तेव्हा भिती वाटत असते. 

बातम्या आणखी आहेत...