आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिवाद:भ्रष्टाचारी नेत्यांना जातीचा पाठिंबा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छगन भुजबळ यांच्याविरोधातील भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून एसीबीने त्यांच्या अब्जावधी रुपये किमतीच्या मालमत्तांवर धाडी घातल्या. भुजबळांना बदनाम करण्याचा हा कट असल्याचा आरोप करत समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलने केली. असे प्रकार इतर जातीतील नेत्यांबाबतही घडताना दिसून येतात. मात्र, त्यामुळे अशा नेत्यांना भ्रष्टाचारासाठी पाठबळ मिळते. या नेत्यांच्या अनुयायांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की, भ्रष्टाचारी व्यक्तींना जात व धर्म नसतो. त्या कारवाईचा सामना करण्यास तो नेता सक्षम असतो. ओमप्रकाश चौटाला, लालूप्रसाद यादव, जयललिता आदी उदाहरणे आपल्यासमोर दिसतात. तेव्हा या भ्रष्टाचारी नेत्यांविरोधात होणाऱ्या कारवाईची चिंता न बाळगता या अनुयायांनी कायद्याला त्याचे काम करू द्यावे.
बातम्या आणखी आहेत...