आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्री म्हणून केजरीवालांनाच पसंती, सर्वेक्षणात मतदारांनी दिला ‘आप’ ला कौल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • २ हजार ३२६ मतदारांमध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणात ५९.७ टक्के मतदारांनी ‘आप’ची निवड केली
  • २४ टक्के मतदारांची भाजपला पसंती

नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. दरम्यान, ताज्या सर्वेक्षणानुसार दिल्लीकरांची मुख्यमंत्री पदासाठी अरविंद केजरीवालच पसंती असल्याचे समोर आले आहे. २१ जानेवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे.

२ हजार ३२६ मतदारांमध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणात ५९.७ टक्के मतदारांनी ‘आप’ची निवड केली, तर २४ टक्के मतदारांची पसंत भाजप आहे. विधानसभा निवडणुकीत स्थानिक मुद्दे महत्वाचे असल्याचे मतदारांचे म्हणणे आहे.

दरम्यान जानेवारीला आठवडा सुटीमुळे अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया बंद असेल. उमेदवार २४ जानेवारीपर्यंत आपला अर्ज मागे घेऊ शकतात. दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी आठ फेब्रुवारीला मतदान होणार आहे, तर ११ फेब्रुवारीला मतमोजणी होईल. सध्याच्या विधानसभेची मुदत २२ फेब्रुवारीला संपणार आहे. २०१५ ला झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत ९२४ उमेदवारांनी अर्ज दाखल केला होता. ज्यातील २३१ उमेदवारी अर्ज बाद करण्यात आले होते. एकूण ६७३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. हा दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या इतिहासातील उमेदवारांचा आतापर्यंतचा सर्वात कमी आकडा होता.