आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेराेजगारी, प्राथमिक समस्यांवर ६० टक्के धुळेकरांना हवा ठाेस उपाय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - दिल्ली-मुंबई इंडस्ट्रिअल काॅरिडाॅरमध्ये महत्त्वाचा भाग असलेल्या धुळे शहरातून दाेन राष्ट्रीय महामार्ग जातात. भाैगाेलिक स्थान, उद्याेगासाठीची अनुकूलता, दिग्गज राजकारण्यांचे केंद्र असूनही शहराचा पाहिजे तसा विकास झाला नाही. शहरातील प्राथमिक सुविधा, विस्तारलेल्या उपनगरांचा विकास अाणि बेराेजगारी राेखण्यासाठी उद्याेगांना चालणारे देणारे धाेरण असावे, याकडे लक्ष देणारे लाेकप्रतिनिधी महापालिकेत असावे, असा सूर धुळेकरांमध्ये उमटला अाहे. या विषयी 'दिव्य मराठी'ने नागरिकांच्या भावना जाणून घेतल्या. त्यात तब्बल ६० टक्के धुळेकरांनी प्राथमिक सुविधा अाणि बेराेजगारी हा प्रमुख मुद्दा जाहीरनाम्यात सुचवला. वाढती बेराेजगारी हेच गुंडगिरीचे प्रमुख कारण असल्याचे मत नागरिकांनी 'दिव्य मराठी'कडे व्यक्त केले. 

 

शहराला दरराेज पाणीपुरवठा करावा. सांडपाण्याचा निचरा हाेऊ शकेल अशा गटारी, खड्डेमुक्त रस्ते करावे. त्याचबरोबर उपनगरात प्राथमिक सुविधा पुरवाव्यात. दर्जेदार प्राथमिक शिक्षण ही धुळेकरांची प्राथमिकता अाहे. काेणत्याही पक्षाने सत्तेस अाल्यास धुळेकरांना या प्राथमिक सुविधा द्याव्या. शहरात राेजगाराच्या संधी नसल्याने बेराेजगार तरुण गुंडांच्या टाेळक्यात सहभागी हाेतात किंवा अवैध धंद्यात अाेढले जातात. शहरातील एमअायडीसीचा विकास झाल्यास, नवीन कारखानदारी अाल्यास गुंडगिरीचा प्रश्न सहज सुटू शकताे, असा विश्वासही नागरिकांनी व्यक्त केला अाहे. जनतेच्या जाहीरनाम्यात धुळेकरांनी भरभरून अापली मते मांडली अाहेत. यातील प्रमुख विषय 'दिव्य मराठी'च्या माध्यमातून अाम्ही राजकीय पक्षांपुढे ठेवत अाहाेत. जनतेच्या जाहीरनाम्याचा राजकीय पक्षांनी त्यांच्या जाहीरनाम्यात समावेश करावा, असे मतही नागरिकांनी व्यक्त केले. 


स्थानिक समस्या 

काॅलनीतील रस्ते प्रमुख रस्त्यांना जाेडणे, पाराेळा राेड, अाग्रा राेड, बारापत्थर राेड येथे उड्डाणपुलाची गरज, माेकाट गुरांचा बंदाेबस्त, पाचकंदील भागात मार्केटची निर्मिती. 
प्राथमिक सुविधा : नियमित पाणीपुरवठा, भूमिगत गटारी, खड्डेमुक्त रस्ते, वाहतूक समस्या, पार्किंग सुविधा, पथदिव्यांची सुविधा, कचरामुक्त शहर, फेरीवाल्यांची समस्या. 
भयमुक्त शहर : गुंडगिरीपासून मुक्ती कायदा-सुव्यवस्था, बेराेजगारांच्या हाताला काम मिळावे, एमअायडीसीचा विकास अाणि विस्तार, इंडस्ट्रिअल काॅरिडाॅरचा विकास, उच्च शिक्षणाच्या सुविधा, उद्याेगांना प्राेत्साहन देणारे धाेरण. 

 

भयमुक्त शहराची मागणी 
गुंडगिरी अाणि अवैध धंद्यांमुळे शहराची राज्यभरात नव्हे तर देशभरात बदनामी झाली अाहे. शहरातील नागरिकांमध्ये नेहमीच भीतीचे वातावरण असते. शहरातील कायदा-सुवस्था चांगली राहावी असे मत व्यक्त करण्यात आले. नागरिकांना शहरात भयमुक्त वातावरण हवे अाहे. त्यासाठी गुंडगिरीचा बंदाेबस्त करणारे लाेकप्रतिनिधी असावे, ही धुळेकरांची प्रमुख मागणी जाहीरनाम्यात अाली अाहे. 

बातम्या आणखी आहेत...