आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाढती भेसळ आणि भेसळीचे दूध पिऊन दंड पेलणारे पैलवान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिवाळसण जवळ आल्याने, काही शहरातून सध्याला रात्री फटाके उडण्याचा आवाज येतोय. चॉकलेट बनवणाऱ्या कंपन्या याकाळात भेटरूपाने चॉकलेट द्यावे अशा जाहिराती करीत आहेत. याबरोबरच भेसळीच्या बातम्याही येत आहेतच. त्यामुळे असेही असू शकते की, मिठाईऐवजी चॉकलेट देण्यात यावे हा त्यामागचा उद्देश असावा.  अन्नपदार्थातील भेसळ व बदलत्या वातावरणामुळे आजारांत वाढ होत आहे. प्रत्येक शहरात खाण्यापिण्याच्या दुकानांच्या संख्येबरोबरच औषधाच्या दुकानांची संख्याही मोठ्याप्रमाणात आहे. आपण कायम भेसळयुक्त पदार्थ खात असल्याने आपण आजारी पडत आहोत. लेबल प्रिंटींग प्रेसमध्ये अखंडपणे बनावट लेबल छापले जात आहेत. या बनावटीकरणाची व्याप्ती कुणीही सांगू शकत नाही. प्रत्येक क्षेत्रात याचे वाढते प्रमाण असून किती प्रमाणात हे क्षेत्र आहे, हे सांगता येत नाही.  केवळ पाच उद्योगात भेसळीमुळे १.१७ कोटी रूपयांचे नुकसान भारतीय अर्थव्यवस्थेला सोसावे लागले होते. बेरोजगारीची समस्याही या क्षेत्राशी जोडलेली आहे. परंतू या विभागाशी संबंधित अधिकारी, ही केवळ अफवा आहे, इतक्या मोठ्याप्रमाणात भेसळ होत नसल्याचे त्यांचे मत आहे. साठच्या दशकात आलेल्या ‘फुटपाथ’मध्येही दिलीप कुमार अभिनीत पात्र न्यायालयात हे मान्य करते की, तो अशाच एका कंपनीचा कर्मचारी आहे व ज्याने भेसळ केली आहे, त्याच्या शरीरातून मृतदेहांचा वास येत आहे. त्यानंतर आलेल्या ऋषिकेश मुखर्जींच्या  राज कपूर, नूतन वर मोतीलाल यांचा अभिनय असलेल्या ‘अनाड़ी’ मध्येही नकली औषध पिल्याने त्याच्या घरमालकीणीचा मृत्यू होतो. हे पात्र ललिता पवारने केलेले असून ती चित्रपटात क्रिश्चन जातीचे पात्र अभिनीत करते, जी त्याच्या भाडेकऱ्याने काढलेले चित्र विकले गेल्याचे खोटे सांगत त्याला त्या चित्राचे पैसे देते. परंतू तिच्या मृत्यूनंतर ते चित्र त्याला तिच्याच घरातून मिळते. याच आशयावरचा ‘फुटपाथ’ चित्रपट पडला तर राजकपूरचा ‘अनाड़ी’ मात्र चांगलाच गाजला. ‘अनाड़ी’च्या यशाचे श्रेय गीत-संगीत व स्वाभाविक अभिनयाला दिले गेेले. ‘फुटपाथ’चे सादरीकरण वास्तववादी तर ‘अनाड़ी’ व्यावसायिक चित्रपटाप्रमाणे सादर झाला. काही वर्षांपूर्वी बिपाशा बासूचा अभिनय असलेला ‘कॉर्पोरेट’मध्ये तिला तिच्या मालकांनी केलेल्या चुकीची शिक्षा देण्यात येते. आपल्याकडेही एकाने केलेल्या घोट्याळाचे भांडे निर्दोषाच्या माथी मारले जाते. मोठे मासे गळाला लागत नाहीत आणि लागले तरी ते जाळे घेऊनच पळून जाण्यात यशस्वी ठरतात.  कृषीक्षेत्रातही मोठ्याप्रमाणावर भेसळ होत असून मूळ बीजेच दूषित करण्यात येत आहेत. अमूलसारख्या उत्पादनातही भेसळ होत आहे आणि करणाऱ्यांना पुढील पिढी कमकुवत निर्माण होईल याचीही चिंता नाही. नकली मोबाइल विकण्यापेक्षा दूधातील भेसळ घातक आहे. हळद शरीरासाठी चांगली असते पण त्यातही भेसळ होत आहे. लग्नातही हळद लावली जाते पण ती नकली असल्याने वधूवरांचे रूपडे बिघडत आहे. ही आश्चर्याची गोष्ट आहे की, नकली लेबल प्रिंट करणाऱ्या मशीन्स अत्यंत आधुनिक व प्रगत तंत्रज्ञानाच्या असून त्या आयात केल्या जातात. मूळात आपली यंत्रणाच पूर्णपणे ठप्प पडली आहे आणि जनता स्वत:लाच त्याबद्दल दोषी ठरवत आहे. कारण हे षडयंत्र रचण्यामागे जनतेचाही काहीअंशी भाग आहेच.  

बातम्या आणखी आहेत...