आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इचखेडा, खालकोट ग्रामस्थ मतदानावर बहिष्कार टाकणार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावल - तालुक्यातील पश्चिम भागातील इचखेडा व खालकोट या आदिवासी गावांंच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. स्वातंत्र्यापासून ते आजतागायत या गावात एसटी बस देखील गेलेली नाही. मात्र, लोकप्रतिनिधींनी ही समस्या न सोडवल्यास या भागातील नागरीक लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याच्या मनस्थितीत आहेत. 

 

चोपडा विधानसभा मतदार संघात असलेल्या यावल तालुक्यातील किनगावपासून पुढे सातपुड्याच्या पायथ्याशी इचखेडा व खालकोट ही पूर्ण आदिवासी कुटुंबांचे वास्तव्य असलेली गावे आहेत. या गावाकडे जाणाऱ्या रस्त्यांची परिस्थिती अतिशय दयनीय आहे. नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत अाहे. वाहनधारकांना वाहन चालवणेही जिकरीचे झाले अाहे. 
स्वातंत्र्यानंतर ते आजतागायत या गावांमध्ये एकवेळही एसटी बस आलेली नाही. त्यामुळे येथील रहिवाशांना शहरी भागात यायचे झाल्यास सायकल, दुचाकी किंवा बैलगाडीचा वापर करावा लागतो. या गावांमध्ये खासगी चारचाकी वाहने जाता. मात्र, आता रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था पाहता आता ते प्रवासी वाहतुकीसाठी धजावत नाहीत. यामुळे होणारा मनस्ताप पाहता लोकप्रतिनिधींनी तातडीने रस्ते दुरुस्तीची कामे व बस फेरी सुरू करावी. अन्यथा आगामी लोकसभा व नंतरच्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकू असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. 

 

विद्यार्थ्यांचे होतात हाल 
या गावातील माध्यमिक, उच्च माध्यमिक तसेच महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोठे हाल होतात एकतर त्यांना शिक्षणाकरीता गाव सोडून स्थलांतर होवुन नातेवाईकांकडे रहावे लागते किंवा आश्रम शाळेत ज्या काही विद्यार्थ्यांची इतर ठिकाणी सोय होत नाही ते किनगाव पर्यंत पायपीट करून येतात व पुढे शिक्षणार्थ जातात. 
 

बातम्या आणखी आहेत...