आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे सरसकट पंचनामे करावेत : पवार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक : 'अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, येऊ घातलेला राम मंदिराचा निर्णय या पार्श्वभूमीवर राज्यात सक्षम सरकारची गरज असताना सत्तास्थापनेबाबत राज्यात पोरखेळ सुरू अाहे,' अशी टीका माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केली. काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसला जनतेने विरोधात बसण्याचा कौल दिला आहे. ती भूमिका आम्ही सक्षमपणे निभावू. शिवसेनेच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन करण्याचा कोणताही विचार किंवा प्रस्ताव नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


नाशिक जिल्ह्यातील शेतीच्या नुकसानीची त्यांनी पाहणी केली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे सरसकट पंचनामे करावेत, त्यांची पूर्ण कर्जमाफी करावी, पुढल्या पिकासाठी कर्ज उपलब्ध करून द्यावे आणि बिलांची वसुली थांबवावी, या मागण्या सरकारकडे करणार असल्याचेही पवार यांनी सांगितले.

साेयाबीन, बाजरीचेही माेठे नुकसान
पवार यांनी नाशिकहून कळवण-सटाण्याकडे जाताना खेडगाव येथील बाळासाहेब बाबूराव दवंगे यांच्या द्राक्षबागेची पाहणी करून उपस्थित सर्व शेतकरी बांधवांना आधार दिला. अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात जवळजवळ सर्वच भागांतील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, त्यात सर्वात जास्त नुकसान द्राक्ष उत्पादकांचे झाले अाहे. खेडगाव परिसरातील सर्वच द्राक्षबागांचे ७० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले अाहे. हातातोंडाशी आलेला मका, सोयाबीन, बाजरी आणि टोमॅटोचेही १०० टक्के नुकसान झाले अाहे. मका, बाजरी, सोयाबीनची सोंगणी झालेली असल्याने पाण्यात भिजलेले पाहायला मिळत आहे.


'कादवा'चे चेअरमन श्रीराम शेटे, आमदार नरहरी झिरवाळ, दत्तात्रय पाटील, एनडीसीसीचे संचालक गणपतराव पाटील यांनी केलेल्या आग्रहामुळे पवार यांनी खेडगावमधील बाळासाहेब बाबूराव दवंगे यांच्या १०० टक्के नुकसान झालेल्या बागेची पाहणी केली. या वेळी माजी खा. समीर भुजबळ, आ. दिलीप बनकर, सुनील पाटील, मोहंमद सय्यद, अक्षय पाटील उपस्थित होते.

शेतकऱ्यांनो, धीर खचू देऊ नका
'नुकसानीमुळे धीर खचलेले शेतकरी आत्महत्या करत आहेत. जेव्हा कोणताच मार्ग दिसत नाही तेव्हा माणूस हे टोकाचे पाऊल उचलतो. माझी त्यांना एकच विनंती आहे, लेकराबाळांकडे बघा, धीर खचू देऊ नका. आम्ही तुमच्यासाठी लढू,' या शब्दांत पवार यांनी शेतकऱ्यांना आश्वस्त केले.
नाशिक जिल्ह्यातीलखेडगाव येथे वादळी वारे व अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या द्राक्षबागेची पाहणी करताना शरद पवार व इतर.
 

बातम्या आणखी आहेत...