England / इंग्लंड : गर्दीतही कार्यक्रम पाहता यावा म्हणून बुटक्यांसाठी तयार केले ‘पॅरिस्कोप ग्लासेस’ 

वन फूट टाॅलर, संशोधकांनी केले नामकरण

वृत्तसंस्था

Jun 12,2019 11:51:00 AM IST

लंडन - बुटक्या लोकांना गर्दीतही सहजपणे कार्यक्रम पाहता यावा म्हणून इंग्लंड येथील संशोधक डॉमनिक विलकॉक्स यांनी “पॅरिस्कोप ग्लासेस” तयार केले आहेत. त्यांना “वन फूट टॉलर’ असे नाव दिले आहे. अशा प्रकारचे चष्मे वापरून गर्दीत उभी असलेली व्यक्ती समोर उभ्या असलेल्या लोकांच्या पलिकडे काय घडते आहे? हे पाहू शकेल. डॉमनिक यांनी सांगितले, मी एक कार्यक्रम पाहात होतो. तेव्हा एक बुटकी महिला बँड न पाहताच नृत्य करत होती. तिला संगिताचा कार्यक्रम पाहता येत नव्हता. त्या महिलेची अवस्था पाहूनच मला अशा प्रकारचा चष्मा तयार करण्याची कल्पना आली.


डॉमिनिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, “पॅरिस्कोप ग्लासेस’ चांगल्या प्रकारे काम करतात. त्यांच्या साह्याने पाठीमागे उभे राहूनही संपूर्ण कार्यक्रम पाहता येतो. हे चष्मे ४५ अंशात डिझाइन केले आहेत. यात आरशासारखी अॅक्रलिक शीट वापरली आहे. या लहान चष्म्याला लावलेल्या वरच्या चष्म्याद्वारे तुम्ही पाठीमागे उभे असला तरी सर्व कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पाहून शकता, असे त्यांनी सांगितले. या अनोख्या चष्म्याबाबत लोकांची उत्सुकता वाढली आहे.

X
COMMENT