आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवी दिल्ली - “व्हॉट्सअॅप पे’ला नॅशनल पेमेंट कॉर्पाेरेशन ऑफ इंडिया(एनपीसीआय)कडून मंजुरी मिळाली आहे. फेसबुकच्या मालकीची ही पेमेंट प्रणाली भारतात टप्प्याटप्प्याने लाँच केली जाईल. सध्या पथदर्शी प्रकल्पांतर्गत काही भारतीय युजर्सकडे याची सुविधा उपलब्ध आहे. व्हॉट्सअॅप-पेही युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस(यूपीआय)चा वापर करेल. फेसबुकने २०१८ मध्ये बीटा टेस्टिंगअंतर्गत भारतात १० लाख लोकांना व्हाॅट्सअॅप पेची सुविधा दिली होती. मात्र, नियामक स्वीकृती मिळण्यात विलंब झाल्यामुळे फेसबुक आतापर्यंत भारतात पूर्ण सेवा सुरू करू शकले नाही. प्रसारमाध्यमातील वृत्तानुसार, पहिल्या टप्प्यात १० लाख युजर्सना इन्स्टंट मेसेजिंग अॅपद्वारे ही सुविधा दिली जाईल. या प्रकरणाशी संबंधित एका सूत्राने सांगितले की, व्हॉट्सअॅप पेला सध्या अाणखी काही नियामक मंजुरी मिळणे बाकी आहे. ती मिळाल्यानंतर कंपनी देशातील युजरसाठी ही पेमेंट प्रणाली लाँच करेल.
पेटीएम, गुगल पेला मिळू शकते कडवे आव्हान
व्हॉट्सअॅप पेच्या लाँचिंगमुळे पेटीएम, अॅमेझॉन पे, गुगल पे यासारख्या प्रणालीला कडवे आव्हान मिळू शकते. यामुळे देशात यूपीआय आधारित व्यवहारात वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या डिसेंबरमध्ये १३० कोटी यूपीआय व्यवहार झाले. हे डिसेंबर २००८ च्या तुलनेत १११% जास्त आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.