आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवाहितेचा छळ, फिनेल पाजल्याचा आरोप; राज्य राखीव दल पोलिसासह तिघांवर गुन्हा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- शिवीगाळ, मारहाण, पैशाचा तगादा आदी कारणाने विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. विवाहिता रुपाली मोफरे यांनी पती, सासू, सासरे या तिघांच्या विरोधात विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. 


पती राहुल मोफरे हा राज्य राखीव दल येथे पोलिस शिपाई आहे. रुपाली (वय २४, रा. होटगी गाव) हिचे २८ फेब्रुवारी २०१६ रोजी लग्न झाले. लग्न झाल्याच्या तीन महिन्यानंतर पती राहुल मोफरे (एसआरपीएफ ग्रुप नंबर १०, पोलिस शिपाई), सासू किसनबाई, सासरे धुळप्पा मोफरे या तिघांनी माहेरून पैसे आणण्याचा तगादा लावला. इतकेच नाही तर ओढणीने हात बांधून फिनेल पाजले व घराला बाहेरून कुलूप लावले. मूलबाळ होत नाही म्हणून मारहाण करून घटस्फोट दे म्हणून धमकी दिली, अशा आशयाची फिर्याद रुपाली मोफरे यांनी दिली. यावरून पती, सासू, सासरे यांच्या िवरोधात विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

बातम्या आणखी आहेत...