आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विरप्पनस्टाईल पिळदार मिशा, पन्नाशी ओलांडलेल्या व्यक्तीचा स्वखर्चातून राज्यभर मतदार जागृतीसाठी दूचाकीवरुन प्रवास

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रवी उबाळे 

बीड- डोक्यावर मतदानाचा हक्क बजावणाऱ्या बोटाची प्रतिकृती, अंगात मतदान जागृतीचा संदेश देणारा पोशाख, भारदार शरीरयष्टीला शोभून दिसणाऱ्या विरप्पनस्टाईल पिळदार मिशा, असे पन्नाशी ओलांडलेले हे व्यक्तीमत्व ठिकठिकाणी लोकांचे लक्ष वेधून घेते. बापूराव दगडोपंत गुंड (वय 52, रा. फुरसुंगी ता. हवेली जि. पुणे) असे त्यांचे नाव. गेल्या 32 दिवसांपासून बापूराव हे राज्याभरात दूचाकीवरुन स्वखर्चाने मतदारांना येणाऱ्या विधानसभा निवडणूकीत मतदान करण्यासाठी जनजागृती करत आहेत. 
बापुराव गुंड म्हणाले की, भरत देशामधील छोट्यात छोटी ग्राम पंचायत निवडणूक असो की मोठ्या मोठी लोकसभा निवडणूक, या निवडणूकीच्या मतदानासाठी नागरीक शंभर टक्के बाहेर पडत नाहीत. जे मतदान करत नाहीत, ते मतदानाच्या सुट्टीमध्ये बाहेरगावरचे नियोजन करुन फिरण्यासाठी जातात. तर काही लोक हे मतदनाच्या पवित्र कामाकडे आपल्यासारख्यांचे काय काम आणि मी मतदान नाही केले तर काही बदल थोडच होणार आणि केले तर सुधारणातरी होतील का ? यासह अनेक प्रश्न निर्माण करतात अन‌् मतदान प्रक्रियेकडे पाठ फिरवतात. असे प्रकार थांबण्यासाठी मागील 35 वर्षांपासून जनजागृती स्वखर्चातून करत आहेत. 
गेल्या 32 दिवसांपासून बापुराव हे पुणे, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सिंधुदुर्ग, सातारा, उस्माबाद, लातूर जिल्ह्यात जाऊन जनजागृती केली. सोमवारी ते बीडमध्ये पोहोचले. मुक्काम करुन बुधवारी सकाळी ते पुढच्या प्रवासासाठी रवाना होणार आहेत. तुळजाभवानीचे दर्शन घेऊन केली जनजागृती मोहिम सुरू

महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानीचे भक्त आहेत. 23 सप्टेंबर रोजी त्यांनी उलटे चालत फुरसुंगी ते तुळजापूर असा प्रवास सुरु केला. 280 किलोमीटरचा हा प्रवास पूर्ण करण्यासाठी त्यांना दहा दिवस लागले. आई तुळजाभवानीच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांनी दुचाकीवरुन मतदार जागृतीच्या मोहिम केली सुरु केल्याचे बापूराव यांनी सांगितले.चार पुस्तके लिहिली


बापूराव यांनी आापर्यंत चार ‘मानवाच्या हितासाठी’, ‘जाग जरा माणसा’, ‘तिलांजली’, ‘माझी माय लक्ष्मी’ अशी चार पुस्तके लिहिली आहेत. यातील ‘माझी माय लक्ष्मी’चा इंग्रजी अनुवादही प्रकाशित झाला असून हे पुस्तक विदेशातही पोहोचले आहे. तसेच 53 सामाजिक कार्यावर काम करतात आहे.
बापूराव दगडोपंत गुंड

बातम्या आणखी आहेत...