आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कार्डिफ - इंग्लंडमधील एक व्यक्ती दोन वर्षांपूर्वी डोकेदुखी आणि अंडकोषातील वेदनेमुळे त्रस्त झाला होता. सुरुवातीला त्याला हे सामान्य दुखणे वाटले परंतु त्रास खूप वाढल्यानंतर तो डॉक्टरांकडे गेला. डॉक्टरांनी त्याच्या संपूर्ण टेस्ट केल्या आणि रिपोर्टही व्यवस्थित आहे. परंतु सिटीस्कॅनमध्ये त्याला ब्रेन कँसर असल्याचे समोर आले. उपचार सुरु केल्यानंतरही दोन वर्षांपासून त्याचा ट्युमर वाढत चालला आहे.
टेस्टमध्ये आढळून आला ब्रेन ट्युमर
- 29 वर्षीय जॅक डोनोवान दोन वर्षांपूर्वी टेस्टिक्युलर पेन (अंडकोषात वेदना)ने त्रस्त होता. त्याचे डोकेही खूप दुखायचे. सुरुवातीला इन्फेक्शन समजून त्याने दुर्लक्ष केले. परंतु त्रास वाढत गेल्यामुळे तो डॉक्टरांकडे गेला.
- जॅकचे चेकअप केल्यानंतर डॉक्टरांना वाटले की, त्याला हा त्रास STI (सेक्सुअली ट्रांसमिटेड डिसीज) किंवा मग ट्विस्टेड टेस्टिकलमुळे होत असेल. यासाठी त्यांनी विविध टेस्ट केल्या परंतु सर्व रिपोर्ट नॉर्मल आले.
- त्यानंतर त्यांनी जॅकचे सिटीस्कॅन केले. रिपोर्ट आल्यानंतर त्यांना समजले की, हा त्रास त्याला ब्रेन ट्युमरमुळे होत आहे. हा एक प्रकारचा जीवघेणा कँसर होता.
- ट्युमरमुळे त्याच्या शरीरातील विविध नसांवर दबाव पडत होता, याचा प्रभाव शरीरातील विविध अवयवांवर पडत होता.
- जॅकला या आजराविषयी समजते त्यावेळी तो गर्लफ्रेंड एमीसोबत ऑस्ट्रेलियात राहत होता. एमी आता त्याची पत्नी आहे. एमीने सांगितले की, 'जॅकच्या कँसरविषयी समजण्यापूर्वी मी त्याला एकदा बाथरूममध्ये या वेदनेने तडफडताना पाहिलेले होते.'
उपचार केल्यानंतरही वाढत आहे ट्युमर
- जॅकच्या ट्युमरविषयी समजून आता दूर वर्ष झाले असून उपचार सुरु आहेत. परंतु दोन वर्षांनंतरही ट्युमरचा आकार काहीच कमी झाला नाही उलट 10 टक्क्यांनी वाढला आहे.
- जॅकने सांगितले की, ' डॉक्टरांनी मला सिटीस्कॅन करण्यासाठी सांगितल्यानंतर मी कन्फ्युज झालो कारण मला छाती आणि टेस्टीलक्समध्ये वेदना होत होत्या. परंतु शरीराच्या सर्व टेस्ट केल्यानंतर डॉक्टरांना काहीच निदान झाले नाही आणि यामुळे त्यांची माझ्या मेंदूची तपासणी करण्याचे ठरवले.'
- 'सिटीस्कॅनमध्ये त्यांना माझ्या मेंदूमध्ये काहीतरी दिसले आणि त्यांनी मला सांगितले की, हा मेंदूतील ताप किंवा मग ब्रेन ट्युमर असू शकतो. माझे बॅडलक, तो ब्रेन ट्युमर निघाला.
- या आजराविषयी समजल्यानंतर सहा महिन्यांनी डोनोवेनला एमी प्रेग्नेंट असल्याचे समजले. त्यानंतर हे दोघे आपल्या मूळगावी म्हणजे इंग्लंड येथे कार्डिफला पोहोचले. येथे एमीने आपल्या मुलाला जन्म दिला.
- जॅकचा ट्युमर सध्या ज्या स्थितीमध्ये आहे त्यानुसार काही भाग काढला जाऊ शकतो परंतु हा ट्युमर पूर्णपणे काढणे शक्य नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.