आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Person Died After Eating 42 Eggs During A Betting Affair In Jaunpur Uttar Pradesh

2 हजार रुपयांसाठी लावली 50 अंडी खाण्याची शर्यत, 41 अंडी खाल्यानंतर झाला मृत्यू

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जौनपूर(उत्तरप्रदेश)- जौनपूरमध्ये अंडे खाण्याची शर्यत जिंकण्याच्या नादात 42 वर्षीय व्यक्तीला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना समोर घडली आहे. अर्गुपूर कलां धौरहरा गावचा रहिवासी सुभाष यादवने आपल्या मित्रासोबत 50 अंडी खाण्याची शर्यत लावली होती. शाहगंज पोलिस स्टेशनचे इंचार्ज जेपी सिंहने सांगितले की, सुभाष ट्रॅक्टर आणि कार चालक आहे. तो बीबीगंज बाजारात आपल्या एका मित्रासोबत अंडी खायला गेला. यावेळी त्यांची शर्यत लागली आणि यातच सुभाषचा जीव गेला.अंडी खाताना सुभाषची मित्रासोबत शर्यत लागली की, 50 अंडी आणि एक बॉटल दारू पिल्यास सुभाषला त्याचा मित्र 2 हजार रुपये देणार. शर्यत मान्य करुन सुभाषने अडी खाण्यास सुरुवात केली. पण, तो फक्त 41 अंडेच खाऊ शकला आणि बेशुद्ध झाला.

ब्रेन हॅमरेजमुळे मृत्यू
 
अंडी खाऊन बेशुद्ध पडल्यावर त्याच्या मित्रांनी त्याला रुग्णालयात नेले. त्याची प्रकृती गंभीर असल्यामुळे डॉक्टरांनी त्याला लखनऊच्या पीजीआय रुग्णालयात रेफर केले. तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याच्या कुटुंबीयांनी दावा केला आहे की, सुभाषचा मृत्यू ब्रेन हॅमरेजमुळे झाला आहे.