आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीच्या तापेवर पालकांनी केले दुर्लक्ष, दुस-यादिवशी बिघडली प्रकृती, प्राण वाचवणेही झाले अशक्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डेलवेयर. घरात रोजच्या वापरातील वस्तूही मुलांसाठी कधी-कधी हानिकारक ठरु शकतात. अमेरिकेत दोन वर्षांच्या मुलीसोबत अशीच घटना घडली. त्या मुलीचे पालक क्रिसमसची तयारी करत होते. यावेळी या लहान मुलीने बटनच्या आकाराची बॅटरी गिळून घेतली. कुटूंबाला हे माहिती नव्हते. 6 दिवसांनंतर मुलीला थोडा ताप आला. पण पालकांना हे नॉर्मल वाटले. त्यांनी यावर दुर्लक्ष केले. पण दूस-या दिवशी तिचे शरीर निळे पडले आणि तिला रक्ताच्या उटल्या होऊ लागल्या. तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, तेव्हा कुटूंबाला कळाले की, तिने बॅटरी गिळून घेतली होती. पण मुलीचे प्राण वाचवता आले नाही. 


तापेवर केले दुर्लक्ष 
- ही घटना ओक्लाहोमच्या डेलवेयर काउंटीमध्ये तीन वर्षांपुर्वी घडली. ब्रायन हे आपली 2 वर्षांची मुलगी ब्रियाना, वडील वाइस आणि पत्नी स्टेफनीसोबत क्रिसमसची तयारी करत होते. त्यावेळी ही घटना घडली. 
- हे कपल ब्रियानाला अजोबांजवळ सोडून ऑफिसमध्ये गेले होते. हे दोघं घरी परतले तेव्हा ब्रियानाला हलका ताप आलेला होता. पण त्यांनी हे जास्त सीरियस घेतले नाही. 
- दूस-या दिवशी ब्रियानाचा चेहरा आणि शरीर निळे पडू लागले. यासोबतच तिला रक्ताच्या उलट्याही होत होत्या. तिची तब्येत जास्त बिघडली होती. 
- ते मुलीला घेऊन तात्काळ हॉस्पिटलमध्ये गेले. तिची इमरजेंसी सर्जरी केली. यानंतर डॉक्टर ब्रियानच्या अन्ननलिकेतील इंटर्नल ब्लीडिंग थांबवू शकले नाही आणि तिचा मृत्यू झाला. 

बॅटरी गिळल्याचे आले समोर 
- ब्रियानाच्या मृत्यूनंतर डॉक्टरांनी सांगितले की, तिच्या बॉडीमधून बटन साइजची बॅटरी सापडली आहे. तिने 6 दिवसांपुर्वी ही बॅटरी गिळली होती. याचा परिणाम तिच्या तब्येतीवर झाला. 
- कुटूंबाला ही गोष्ट माहिती नव्हती. ब्रियानाचे अजोबा म्हणाले की, एका मिनिटांपुर्वी ती परफेक्ट होती आणि पुढच्या मिनिटालाच तिचा मृत्यू झाला. तिने बॅटरी गिळली होती हा आम्ही अंदाजही लावला नव्हता.
- आता ब्रियानाचे कुटूंब लोकांना बॅटरीच्या धोक्याविषयी अवेयर करत आहेत. ते त्यांची स्टोरी लोकांना सांगत आहेत. कारण लोकांनी त्यातून काही तरी शिकावे.

बातम्या आणखी आहेत...