आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रक्षाबंधनला ज्या मुलीने बांधली राखी, 10 दिवसानंतर त्याच बहिणीसोबत केले लव्ह मॅरेज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यमुनानगर(हरियाणा)| भावा बहिणीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका मुलाच्या आईसोबत (घटस्फोटीत) एका तरुणाने लग्न केले. या तरुणाने लग्नापुर्वीच या महिलेला बहीण मानुन तिच्या हाताने राखी बांधून घेतली होती. रक्षाबंधनच्या 10 दिवसांनंतरच त्यांनी लव्ह मॅरेज केले आणि फरार झाले. 


पोलिस म्हणाले - त्यांनी त्यांच्या मर्जीने लग्न केले आहे
लग्न करणा-या महिलेच्या आईने मुलीचे अपहरण केल्याची तक्रार पोलिसांत नोंदवली आहे. पण पोलिसांनी महिलेचा जबाब नोंदवला तेव्हा तिने सांगितले की, तिने तिच्या मर्जीने लग्न केले आहे. तिला तिच्या पतीसोबतच राहायचे आहे. पण लग्न करणा-या महिलेच्या आईचा आरोप आहे की, तिच्या मुलीची फसवणूक केली जात आहे. आता तिला मुलीला भेटूही दिले जात नाही. महिला मंगळवारी पुन्हा एकदा पोलिसांकडे गेली आणि मला माझी मुलगी द्या अशी मागणी केली. पण पोलिसांनी या प्रकरणी कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यास नकार दिला आहे. 


पहिल्या नव-यासोबत एप्रिलमध्ये घेतला घटस्फोट 
मॉर्डन कॉलोनी येथे राहणा-या महिलेने सांगितले की, पाच वर्षांपुर्वी तिच्या मुलीचे लग्न सुल्तानपुर येथे राहणा-या व्यक्तीसोबत झाले होते. तिच्या मुलीचा तिच्या नव-यासोबत वाद होत होता. एप्रिलमध्ये दोघांचा घटस्फोट झाला. यानंतर तिची मुलगी तिच्या 4 वर्षांच्या मुलासोबत आमच्या घरी राहत होती. महिलेचा आरोप आहे की, पोलिसही तिची मदत करत नाही. माझ्या मुलीने ज्या व्यक्तीसोबत लग्न केले आहे. त्याच्या आईने आणि त्याने यापुर्वी अनेक लोकांकडून पैसे लुटले आहे. ते फसवणुक करत आहेत असा या आईचा आरोप आहे. 

 

लोन घेण्यासाठी आली होती तरुणाची आई, नंतर जवळीक वाढवली 
महिलेने सांगितले की, 3 महिन्यांपुर्वी तिच्याजवळ पूजा नावाची महिला तिला ग्रुप लोन देण्यासाठी भेटली. तिची मैत्रिण तिला घेऊन आली होती. तिने दिड लाख रुपयांचे ग्रुप लोन घेऊन दिले. याच काळात पूजाची मुलगी आणि मुलगा त्यांच्या घरी येऊ लागले. दोन्ही कुटूबांमध्ये जवळीक वाढली. रक्षाबंधनच्या दिवशी तिच्या मुलाने माझ्या मुलीच्या हातून राखीही बांधून घेतली. मग एक दिवस माझी मुलगी तिच्या 4 वर्षांच्या मुलासोबत अचानक न सांगता निघून गेली. सात डिसेंबरला तिची मुलगी आणि पूजाचा मुलगा कोर्टात होते. नंतर कळाली की, तिने  पूजाच्या मुलासोबत लग्न केले आहे. 

 

महिलेने स्वतःच्या मर्जीने लग्न केले 
गांधी नगर चौकीचे इंचार्ज भूपेंद्र राणा सांगतात की, महिलेने आपल्या मर्जीने त्या तरुणासोबत लग्न केले आहे. तिने हे स्वतः जबाब नोंदवताना सांगितले आहे. पोलिसांनी तिला आणि तिच्या आईची भेट घालवूनही दिली आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...