आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांकडे तक्रार केली म्हणून महिलेच्या घरात घुसून बलात्कार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आरोपीस 6 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी
  • महिलेचा पती विदेशात वास्तव्यास असून ती मुलासह पडेगाव परिसरात राहते

औरंगाबाद : मुलासोबत एकटी राहणाऱ्या महिलेच्या घरात घुसून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना पडेगाव परिसरात ३ जानेवारी रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडली. यात छावणी पोलिसांनी आरोपी मोहम्मद जुनेद ऊर्फ थापा मोहम्मद अली (३४, रा. चाऊस कॉलनी, शहाबाजार) याला शुक्रवारी रात्री अटक केली.

२३ वर्षीय विवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार, तिचे पती विदेशात वास्तव्याास असून ती मुलासह पडेगाव परिसरात राहते. काही दिवसांपूर्वी कौटुंबिक कार्यक्रमामध्ये तिची व्यापारी असलेल्या मोहम्मद सोबत ओळख झाली होती. दरम्यान त्यांच्यामध्ये एका गोष्‌टीला घेवून वाद झाला. त्यामुळे महिलेने मोहम्मद जुनेद याच्याविरोधात पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली. दरम्यान शुक्रवारी, ३ जोनवारी २०२० रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास पीडिता घरात असताना मोहम्मद तिच्या घरी गेला. पीडितेने दरवाजाच्या दुर्बिनीतून पाहिल्यानंतर तेथे दुसरेच असल्याने तिने दरवाजा उघडला. मात्र, तेव्हा तो मोहम्मदचा मित्र जुनैद होता. जुनैदला बाजूला करून मोहम्मद घरात शिरला. त्यानंतर पोलिसांकडे शिवीगाळ करून धमकी दिल्याची तक्रार का केली, असे विचारून मारहाण केली. त्यानंतर तिच्यावर बळजबरी अत्याचार केल्याचा आरोप महिलेने केला आहे. छावणी पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

न्यायालयाने त्याला ६ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. उपनिरीक्षक अतुल ठोकळ पुढील तपास करत आहेत.

लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार

जिन्सी परिसरात राहणाऱ्या तीस वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष दाखवून लियाकत पठाण शौकत पठाण (रा.बेगमपुरा) याने वेळोवेळी लैंगिक अत्याचार केला. २०१७ पासून महिला व लियाकतची ओळख झाली होती. परंतू कालांतराने लियाकतने मला दारु पाजून मारहाण करत अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर घटना जिन्सी पोलिस ठाण्याच्या हद्दित घडल्याने जिन्सी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...