आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Income Tax वाचवण्यासाठी 'HRA' करेल मदत; जाणून घ्या कशाप्रकारे करतात कॅल्क्युलेशन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- इनकम टॅक्स वाचवण्याचे अनेक पर्याय असतात. त्यापैकीच एक उपाय आहे तो म्हणजे 'हाउस रेंट अलाउन्स' (HRA). हा तुमच्या सॅलरीचा एक पार्ट असतो. तुमची सॅलरी स्लिप पाहा जर त्यात 'HRA' संबंधित काही माहिती मिळत असेल तर त्या माध्यमातून तुम्ही टॅक्स वाचवू शकतात. परंतू 'HRA'चा फायदा फक्त सॅलरी मिळणाऱ्या, किंवा व्यक्ती एखाद्या भाड्याच्या घरात राहतो अशा लोकांनाच मिळू शकतो. ज्या लोकांचा स्वत:चा बिजनेस आहे त्यांना या संधीचा फायदा घेता येणार नाही.

 

'HRA'चा फायदा घेण्यासाठी महत्वाचे डॉक्‍यूमेंट्स
'HRA'चा फायदा घेण्यासाठी तुमच्याकडे 
> एक प्रमाणित रेंट अॅग्रीमेंट असणे आवश्यक आहे. 
> त्या रेंट अॅग्रीमेंटमध्ये मासिक भाडे, अॅग्रीमेंटची मर्यादा किंवा तुमच्याकडून होणाऱ्या खर्चांची माहीत असणे आवश्यक आहे.
> अॅग्रीमेंटवर तुमची आणि घर मालकाची सही गरजेची आहे.
> अॅग्रीमेंट 100 किंवा 200 रुपयांच्या स्टँप पेपरवर असायला हवे.
> घर मालकाचे पॅन कार्ड त्यासोबतच तुम्ही घरभाडे भरल्याची पावती या डॉक्‍यूमेंट्सची आवश्यकता आहे.

 

'HRA'च्या कॅल्क्युलेशनची अशी आहे पद्धत
सर्वात आधी अपॉइंटरकडून तुम्हाला एका वर्षात किती 'HRA' मिळाला हे पाहा. जर तुम्ही स्वत:च्या शहरात राहत असाल तर तुमच्या पगाराचा 50 टक्के आणि दुसऱ्या शहरात राहत असाल तर 40 टक्के भाग वेगळा ठेवा. त्यानंतर तुमच्या पगरातून 10 टक्के अधिक देलेले भाडे. या पद्धतीने कॅल्क्युलेशन करताना तुमच्या मुळ वेतनसह महागाई भत्ता आणि इतर गोष्टी जोडलेल्या असाव्यात.

 

उदाहणार्थ, एक व्यक्ती दिल्लीत नोकरी करुन भाड्याच्या घरात राहतो. त्याला महिन्याला पंचवीस हजार आणि महागाई भत्ता दोन हजार रुपये आहे. यातून तो दर महिन्याला पंधरा हजार घराचे भाडे भरतो. तर त्याला एक लाख 'HRA'मिळतो. अशाप्रकारे तो एक लाखाची बचत करु शकतो.

 

बातम्या आणखी आहेत...