Home | Khabrein Jara Hat Ke | peru student doing home work under street light goes viral

रस्त्यावरील सीसीटीव्ही चेक करताना एका संशयित मुलाकडे गेले पोलिसांचे लक्ष, घटनास्थळ गाठून परिस्थिती पाहिली तेव्हा हृदय पिळवटले

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 11, 2019, 03:02 PM IST

पोलिसांनी हा व्हिडिओ फेसबूकवर शेअर करताच तो व्हायरल झाला

  • peru student doing home work under street light goes viral

    लिमा - पेरूच्या रस्त्यांवर बसलेल्या एका 12 वर्षांच्या मुलाचा व्हिडिओ इंटरनेटवर खूप शेअर केला जात आहे. तो रस्त्याच्या कडेला पथदिव्याखाली अभ्यास करत होता. त्याच्या घरात वीजेची व्यवस्था नसल्याने तो दररोज रात्री याच ठिकाणी येऊन आपला होमवर्क करायचा. रस्त्यांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासत असताना पोलिस अधिकाऱ्यांचे लक्ष या मुलाकडे गेले. त्यांना सुरुवातीला हा संशयित गुन्हेगार असल्याचा भास झाला. त्यांनी घटनास्थळ गाठून जेव्हा परिस्थितीचा आढावा घेतला, तेव्हा त्यांच्यासमोर खरे चित्र स्पष्ट झाले. आता पोलिसांनी हा व्हिडिओ त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर शेअऱ केला आहे.


    मोचे शहर पोलिसांनी आपल्या फेसबूक पेजवर शेअर केलेला हा व्हिडिओ आतापर्यंत 50 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला. केवळ देशच नव्हे, तर परदेशी माध्यमांमध्ये सुद्धा याची चर्चा झाली. घरातील परिस्थिती वाइट असतानाही शिक्षणाविषयी मुलाच्या मनात असलेली जिद्द पाहून प्रत्येकाचे हृदय पिळवटले. स्थानिक माध्यमांनी सुद्धा हा मुद्दा लावून धरल्यानंतर त्या मुलाची कहाणी समोर आली. त्याचे नाव विक्टर मार्टिन एंग्यूलो असून त्याच्या घरात वीज कनेक्शन नाही. आईने सांगितल्याप्रमाणे, संध्याकाळी शाळेतून घरी आल्यानंतर जास्त वेळ प्रकाश राहत नाही. अशात रात्र झाल्यानंतर मुलाला स्ट्रीट लाइटखाली बसून अभ्यास करावा लागतो.


    प्रशासनाकडून मदतीचे आश्वासन

    विक्टरची कहाणी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर स्थानिक महापौरांनी त्याच्या घरात जाऊन कुटुंबियांची भेट घेतली. विक्टरच्या शिक्षणाविषयीच्या आवडीचे त्यांनी तोंडभर कौतुक केले. तसेच वैयक्तिरित्या अशा होतकरू विद्यार्थ्याच्या घरात वीज जोडणी करून देणार असे आश्वस्त केले. विक्टरला मोठे होऊन पोलिस अधिकारी व्हायचे आहे. मोठा होऊन देशातील भ्रष्टाचार दूर करू आणि आपल्यासारख्या असंख्य मुलांना त्यांची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी मदत करू असे विक्टर सांगतो.

Trending