आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीला मनात येईल तेव्हा सेक्सची मागणी करायचा पती, म्हणायचा- माझ्याशी संबंध बनव, नाहीतर आत्महत्या करीन; इच्छा नसूनही प्रत्येक वेळी भीतीने ऐकायची पत्नी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये एका महिलेने आपल्या पतीच्या सततच्या सेक्सच्या मागणीला कंटाळून त्याची हत्या केली आहे. चौकशीत महिला म्हणाली की, तिचा पती तिला उठसूट कधीही सेक्सचा हट्ट करत होता. त्याला नकार दिल्यावर आत्महत्येची धमकी द्यायचा आणि प्रत्येक वेळी भीतीपोटी मला ऐकावे लागायचे. परंतु आता सर्जरीमुळे डॉक्टरांनी मला आराम करण्याचा सल्ला दिला होता, तरीही त्याने सेक्ससाठी दबाव टाकला. या वेळी मात्र पत्नीच्या तळपायाची आग मस्तकात गेली एवढा राग आला. रागाच्या भरातच तिने पतीची हत्या केली.

 

एवढा लैंगिक छळ करायचा वासनांध पती...
- ही घटना न्यू टाउन शहरातील आहे. येथे गत आठवड्यात पतीच्या हत्येप्रकरणी आनिंदिता पॉल डे नावाच्या महिलेला अटक करण्यात आली आहे, जी स्वत: वकीलही आहे.
- सोमवारी महिलेची पोलिस चौकशी सुरू झाली, यात तिने आपला पती रजतच्या टॉर्चरची कहाणी ऐकवली.
- पोलिसांनी महिलेच्या जबाबाच्या आधारे सांगितले की, तिचा पती तिला शारीरिक आणि मानसिक टॉर्चर करत होता, यामुळे ती खूप त्रस्त झाली होती.
- महिलेने सांगितले होते की, ती पतीला जेव्हाही नकार देण्याचा प्रयत्न करायची, तेव्हा तो आत्महत्येची धमकी द्यायचा. यामुळे प्रत्येक वेळी मजबूरीने तिला होकार द्यावा लागायचा.

 

का उचलले एवढे भयंकर पाऊल? 
- महिलेने सांगितले की, 2 महिन्यांपूर्वी तिची फॅलोपियन ट्यूबची सर्जरी झाली होती, यानंतर डॉक्टरांनी तिला सक्त आराम करण्याचा सल्ला दिला होता, परंतु रजतने वारंवार बळजबरी संबंधांसाठी प्रयत्न केले.
- आपल्या बिघडलेल्या तब्येतीमुळे आनिंदिता आधीच त्रस्त होती आणि आता रजतच्या डिमांडमुळे तिचा पार आणखीनच चढला. म्हणून या रागाच्या भरातच आनिंदिताने चार्जरने पतीला मारहाण सुरू केली.
- यानंतर तिने पतीची हत्या केली. तथापि, पोलिसांसमोर आता हा मोठा प्रश्न आहे की, तिने एकट्यानेच ही हत्या केली की आणखीही कुणी यात सामील आहे.
- याशिवाय पोलिस मेडिकल चेकअप करून तिने सांगितल्या तथ्यांचीही पडताळणी करत आहेत. कारण आनिंदिताने अनेकदा आपला जबाब बदललेला आहे. 

 

 

बातम्या आणखी आहेत...