आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साेलापूरमध्ये साकारली तब्बल पावणेदोनशे वर्षांपूर्वीची पेशवेकालीन जरतारी सुती पैठणी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - साडी कलाप्रकाराचा विविधांगी अभ्यास करणाऱ्या सोलापूरचे  वस्त्र संशोधक व साडी डिझायनर विनय नारकर यांनी पावणेदोनशे वर्षांपूर्वीची जरतारी सुती पारंपरिक पेशवेकालीन पैठणी तयार करण्याचा विक्रम केला आहे. नारकर यांच्या या अभ्यासपूर्ण  प्रयत्नामुळे  चादरीसाठी  प्रसिद्ध असलेल्या सोलापूरच्या ख्यातीत पेशवेकालीन पैठणी तयार करणारे देशातील पहिले शहर म्हणून आणखीन एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. 
सुती कापडात जरतारी नक्षीकाम करून नारळी बुट्ट्यांची, काठाची रुबाबदार पदराची पैठणी पेशवेकाळात हाेती. जसजसा काळ पुढे जाईल तसतसे त्या पेशवेकालीन पैठणीचे रूप अंतर्धान पावत गेले. काळानुसार  नव्या पैठण्या या सुतीऐवजी रेशमी प्रकारात निर्माण होऊ लागल्या. पुढे त्याचे रंग आणि नक्षीकाम हे पूर्णतः पैठणीच्या रूपाला सोडून भरपूर नक्षी अन् भडक रंगाकडे झुकले गेले.  तेव्हा पैठणी या वस्त्र प्रांतातील  या जुन्या प्रकाराचा अभ्यास करून आपण मूळ पैठणी तयार करावी, असा विचार दोन वर्षांपूर्वी विनय नारकर यांच्या डोक्यात आला.  दोन वर्षांपासून सलग याकरिता  विनय यांनी  हँड क्राफ्टेड इंडियन टेक्सटाइल, सारीज ट्रॅडिशन अँड बियांड, इंडियन टेक्स्टाइल सोर्सबुक अशा अनेक पुस्तकांतून इतिहास शोधून काढला.  सातवाहन काळ, इजिप्तची  वस्त्र कलाकुसर आणि पेशवेकाळापर्यंतचा अभ्यास करत मूळ पैठणीचे संशोधन केले. त्यातून पैठणीची नक्षी कशी होती, त्यांची ठेवण कशी होती, पोत कसे होते, त्याची छायाचित्रे अशी सर्व माहिती मिळाली.  ही सर्व माहिती मिळाल्यानंतर  पुढचा प्रवास हा वेगळाच होता. हातमागावर विणली जाणारी सुती पैठणी करणे आव्हानात्मक होते. त्यासाठी विनय यांना तेलंगणात जावे लागले. तेथील काही कारागीर यांना सोबत घेऊन अभ्यासपूर्ण अशा पेशवेकालीन पैठणीची नक्षी तयार करून त्याचे वर्षभर काम सुरू ठेवले.  दोन वर्षांनंतर अशी पहिली पैठणी साकारण्यात ते यशस्वी झाले.

 

पेशव्यांच्या काळात पैठणीला ऊर्जितावस्था
अनेक पुस्तकांत सातशे-आठशे वर्षांपूर्वी इजिप्त आणि भारत या दोन देशांतच वस्त्रकला अस्तित्वात होती अशा नोंदी आहेत.  भारतात सातवाहन काळापासून  जरतारी वस्त्राचा उल्लेख आहे. सातवाहन काळानंतर पैठणीची निर्मिती झाली. पुढे परकीयांचे आक्रमण जसे होत गेले तशी ही कला कमी होत गेली. मात्र पेशवेकाळ आल्यानंतर पुन्हा या कलेला उभारी आली.  पूर्वीचे प्रतिष्ठान शहर म्हणजेच आजचे पैठण हे पेशव्यांच्या या कलेला वाव दिल्याने बहरले आणि येवला, पैठण येथे पुन्हा पारंपरिक पैठण्या तयार होऊ लागल्या.  त्याच पैठणीचा आविष्कार पुन्हा एकदा सोलापुरात झाला आहे. 

 

भरपूर नक्षी म्हणजे पैठणी नाही 
पैठणीच्या पदरावर माेर असताेच असे नाही. खरी पैठणी हे सुती जरतारी बुट्ट्यांची रुबाबदार पदराची सहज घेतली जाणारी  व आरोग्यास उत्तम असते. एक साडी तयार करण्यासाठी तीन ते साडेतीन महिने लागतात, मात्र या साडीला तयार केल्यानंतर त्याच्यावर फिरवलेला हात  हा सुखद असतो. 
- विनय नारकर, साडी डिझायनर व वस्त्र संशोधक

 

 

बातम्या आणखी आहेत...