आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Pete Frets Who Inspired Many Around The World For The Ice Bucket Challenge In Died At 34

बिल गेट्स, टॉम क्रूज आणि जॉर्ज बुशसह जगभरातील अनेकांना आइस बकेट चॅलेंजसाठी प्रेरीत करणाऱ्या पीट फ्रेट्सचे निधन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 34 वर्षीय पीट फ्रेट्सचे सोमवारी निधन झाले, 2014 मध्ये आइस बकेट चॅलेंज सुरू केले

वॉशिंग्टन- जगभरात आइस बकेट चॅलेंजला लोकप्रिय करणाऱ्या पीट फ्रेट्सचे सोमवारी 34 वर्षी निधन झाले. फ्रेट्स न्यूरोलॉजिकल डिजीज- एएलएस(एम्योट्रोफिक लेटरल स्लेरोसिस)ने ग्रस्त होते, याला लू गेहरिग डिजीज नावानेही ओळखले जाते. त्यांना या आजाराची माहिती 2012 मध्ये 27 व्या वर्षी लागली. बेसबॉल खेळाडू राहीलेल्या फ्रेट्सने 2014 मध्ये आइस बकेट चॅलेंज सुरू केले. याअंतर्गत लोकांना आपल्या अंगावर बर्फाने भरलेली बादली टाकावी लागले आणि त्याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल करावा लागतो. या चँलेंजचा उद्देश न्यूरोलॉजिकल आजाराने पीडित लोकांसाठी चॅरिटी जमा करण्याचा होता.
फ्रेट्सकडून प्रेरीत होऊन या चॅलेंजला जगभरातील प्रसिद्ध व्यक्तींनी केले. यात अमेरीकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश, मायक्रोसॉफ्टचे फाउंडर बिल गेट्स आणि हॉलिवूड स्टार टॉम क्रूजसह अनेकांनी केले.

आइस बकेट चॅलेंजमधून जमा झाले 1418 कोटी रुपये
 
एएलएस असोसिएशनने सांगितल्यानुसार, 2014 मध्ये आइस बकेट चॅलेंजमधून जगभरातील अंदाजे 1.7 कोटी लोकांनी यात भाग घेतला आणि यातून अंदाजे 20 कोटी डॉलर (1418 कोटी रुपये) जमा झाले. या पैशांचा वापर न्यूरोडीजेनेरेटिव डिजीजवर रिसर्च करण्यासाठी केला जातोय. या आजारात रुग्णाच्या मांसपेश्या कमजोर होतात, त्यामुळे मूव्हमेंट्स करणे अवघड जाते. एएलएसवर आतापर्यंत कोणताच उपाय सापडला नाहीये.

बातम्या आणखी आहेत...