आंतरराष्ट्रीय / ब्रिटेनमध्ये एका बीअरसाठी हॉटेलने चार्ज केले 50 लाख रुपये, नंतर मागितली माफी

घटना ऑस्ट्रेलियातील पत्रकार पीटर लालोरसोबत घडली

Sep 19,2019 11:44:32 AM IST

मॅनचेस्टर(ब्रिटेन)- मॅनचेस्टरच्या एका हॉटलने ऑस्ट्रेलियातील पत्रकाराला एका बीअरसाठी 50 लाख रुपयांचे बिल दिले. पत्रकार पीटर लालोर ऑस्ट्रेलियाच्या एका वृत्तपत्रात क्रिटा संपादक आहेत आणि एशेस टेस्ट सीरीज कव्हर करण्यासाठी ब्रिटेनमध्ये गेले होते. हॉटलमध्ये त्यांनी एक बीअर पिली.

पीटर जेव्हा बिल देण्यासाठी जात होते, तेव्हा त्यांनी आपला चष्मा घातला नव्हता. यावेळी पेमेंट मशीनमध्ये काहीतरी बिघाड झाला आणि पेमेंट झाली. त्यानंतर बारमध्ये उपस्थित स्टाफने बिलची स्लीप पाहिली, तेव्हा त्याला धक्का बसला. त्याने पीटरला सांगितले की, तुमच्याकडून 50 लाख रुपयांचे पेमेंट झाले आहे.


10 दिवसानंतर मिळेल रिफंड
बिलमध्ये इतके पैसे गेल्यावर पीटर लगेच हॉटेलच्या मॅनेजरकडे गेले. बिलमध्ये करेक्शन करण्यास सांगितले. मॅनेजरने आश्वासन दिले की, लवकरच त्यांचे पैसे त्यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर केले जातील.

X